नवीन नांदेड। राज्य शासनाच्या वतीने गणेशोत्सव सणाच्या निमित्ताने देण्यात येणाराय आनंदचा शिधा परिसरातील स्वस्त धान्य काही दुकानावर येऊन सुध्दा संगणकीय प्रणाली बंद असल्याने संबधित दुकानदारा कडुन वितरण होत नसल्याने लाभार्थी हे चकरा मारून तंग झाले आहेत तर काही दुकानावर अघापही ऊपलब्ध झाले नसल्याने मिळणार का नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शासनाने स्वस्त धान्य दुकानातून गणेशोत्सव पुर्वी शंभर रूपया मध्ये तेल,रवा ,चन्नादाळ,साखर प्रत्येकी एक किलो प्रमाणे आंनदाचा शिधा वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले, सिडको परिसरात एकुण लाभार्थी ३५५० आहेत पंरतु गणेशोत्सव सणाला एकच दिवस शिल्लक असून सिडको परिसरातील एकुण सात दुकान पैकी केवळ एका दुकानात आनंदचा शिधा लाभार्थी साठी प्राप्त झाल्यानंतर ही संगणकीय प्रणाली चालत नसल्याने लाभार्थी मात्र हेलपाटे मारत असल्याचे चित्र दिसत आहे.
अनेक दुकाने बंद अवस्थेत असल्याने संपर्क साधावा कोणाला हा प्रश्न उपस्थित झाला असुन सिडको भागात तात्काळ आनंदाचा शिधा पाठवुन वितरीत करण्याची मागणी लाभार्थी यांच्या कडून होत आहे. या प्रकरणी महसूल विभागाच्या पुरवठा विभागासह, वरीष्ठ अधिकारी यांना संपर्क करून सिडको परिसरातील स्वस्तधान्य दुकानात आनंदाचा शिधा उपलब्ध करून तात्काळ वितरित करण्याची मागणी होत आहे.