नांदेड। तालुक्यातील तालुका कृषी आधिकारी कार्यालय नांदेड कृषि विभाग यांच्या अंतर्गत सोमेश्वर येथे राज्य पुरस्कृत अंतर्गत शेती शाळा सोयाबीन पिकाची बाबुराव नामदेव बोकारे यांच्या शेतात घेण्यात आली. शेती शाळेत प्रमुख मार्गदर्शन बी जे होनवडकर कृषी सहाय्यक यांनी केले व शेतकऱ्यांना किडीची ओळख करून दिली व निंबोळी अर्क घरचे घरी कसे तयार करावे याविषयी मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांनी दशपर्णी अर्क तयार करून जैविक कीटकनाशकाचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करावा जर जैविक कीटकनाशकाने कीड नियंत्रणात येत नसेल तर कीटकनाशकाचा वापर करावा.
सध्या सोयाबीन पिकावर पिवळा मोजॕक विषाणू रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये आढळून येत आहे या विषाणूजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी जर पीक लहान असते वेळेस या रोगाची तीव्रता किती आहे हे ओळखून रोगग्रस्त झाडे त्यावेळेसच उकडून नष्ट करावी या विषाणूमुळे कुठलेही कीटकनाशक नाहीये मात्र त्याच्या प्रसार हा पांढऱ्या माशीच्या रस शोषण करणा-या किडीमार्फत होतो. यामुळे या किडीचे नियत्रंन केले तर रोगाचा प्रसार वेळीच रोखता येतो.
या पिवळा मोझॕक विषाणुजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी 1)एकरी 20 पिवळे चिकट सापळे लावावे. 2)व्हर्टीसिलियम लेकॕनी या जैविक कीटकनाशकची 4 ते 5 ग्रॕम प्र.लि. पाणी या प्रमाणात फवारणी करावी. 3)प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असेल तर अॕसेल तर अॕसेटॕमीप्रीड 25% + बायफेंन्थ्रीन 25%डब्लुजी 0.5 ग्ॕम प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी अशी माहिती देण्यात आली.
कार्यक्रमास उपस्थित जनार्धन पांडोजी बोकारे( संरपंच) सोमाजी बळीराम बोकारे(पो.पा.) बाबुराव नामदेवराव बोकारे (उप.सरपंच) मनोहर बोकारे,तुकाराम बोकारे,पृरसराम बोकारे,गजानन बोकारे, चाँदु बोकारे,संजय बोकारे,नामदेव बोकारे शंकर बोकारे, भारत गंगातीरे,विठ्ठल बोकारे,ज्ञानेश्वर बोकारे ,निखिल बोकारे ,माधव बोकारे ,मोहन बोकारे,गणेश बोकारे,पांडूरग बोकारे,ओमकार बोकारे,या शेतीशाळेस मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते.