नवीन नांदेड| निजाम राजवटीच्या जोखडातून मराठवाडा प्रदेश मुक्त होण्याचा हा अमृत महोत्सवी वर्ष म्हणजे मराठवाड्याच्या उन्नतीतला महत्त्वाचा सुवर्ण क्षण होय, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांनी केले.
श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वसंतराव नाईक महाविद्यालय वसरणी येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षे व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला, याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य घुंगरवार बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांच्या हस्ते राष्ट्र ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त उपप्राचार्य डॉ.व्ही.आर. राठोड यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
महाविद्यालयाच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनावर आधारित व आजादी का अमृत महोत्सवाची सांगता या विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले,उपप्राचार्य डॉ.व्ही. आर.राठोड, वरिष्ठ प्रा.डॉ.पी.एल. चव्हाण, प्रो.डॉ.रेणुका मोरे,कनिष्ठ महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा.एन.पी.दिंडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.जगदीश देशमुख,क्रीडा संचालक डॉ. साहेबराव मोरे, कार्यालयीन अधीक्षक आर.डी.राठोड यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.साहेबराव शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.नागेश कांबळे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.