नायगाव, रामप्रसाद चन्नावार। येथील शरदचंद्र कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये ग्रंथालय विभागाच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव वर्ष व स्वारातीम विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 17 – 18 सप्टेंबर 2023 रोजी दोन दिवशीय ऐतिहासिक ग्रंथाचे ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले होते .
या ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळी एज्युकेशन सोसायटी नायगाव चे सचिव प्रा . रवींद्र पाटील चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून होते . या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष श्री . वसंतराव मेडेवार यांनी केले त्यांनी आपल्या उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांनी ग्रंथावर प्रेम करण्याचा सल्ला दिला. यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक श्री. संगमनाथ कवटीवार , जनता ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य ,श्री .शं ल . अंजनीकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . के .हरीबाबू ,उपप्राचार्य डॉ . श्याम पाटील इत्यादी उपस्थित होते. प्रा . रवींद्र पाटील चव्हाण यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण ही ग्रंथालयाच्या सानिध्यातच होत . असे मत व्यक्त केले.
तत्पूर्वी ग्रंथालयातील ऐतिहासिक पुस्तकांचा उत्कृष्ट ग्रंथसंग्रह विकसित करण्यात आला होता .ऐतिहासिक व तत्सम साहित्याचा वाचकांना परिचय व्हावा हा या ग्रंथ प्रदर्शनाचा उद्देश असल्याचे ग्रंथपाल डॉ . भरत आर .लोकलवार यांनी सांगितले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रो. डॉ . बलभीम वाघमारे यांनी केले. तर प्रास्ताविक हिंदी विभागप्रमुख प्रो. डॉ . श्रीरंग वट्टमवार यांनी केले त्यांनी महाविद्यालयाच्या विकासात ग्रंथालयाचे योगदान कशाप्रकारे आहे याची माहिती उपस्थितांना करून दिली . या ग्रंथप्रदर्शनास जवळपास दोन दिवसात 212 वाचकांनी सहभाग नोंदवला . यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते . मान्यवरांचे आभार ग्रंथपाल डॉ . भरत आर . लोकलवार यांनी मानले .