लोहा। मेरी मर्जी …प्रमाणे अनेकदा आपले वागणे स्वछंद असते.” आम्हाला काय कोणाची भीती” ..असा अविर्भावात अनेकजण वावरत असतात.पण सार्वजनिक ठिकाणी वावरणे…बोलणे ..वागणे याचेही काही संकेत असतात..असा छोटया छोट्या बाबींकडे कार्यतत्पर पोलीस अधिकाऱ्यांचे लक्ष असते. सिंघम- २ नावाने प्रसिद्ध झालेले पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी आठ दिवसातच लोहा शहराला वाहतुकीची शिस्त लावली. तर दुसरीकडे १० रोड रोमियो व शर्टचे बटन खुले सोडून ठाण्यात जोरजोरात बोलणारे ४ जण असा १४ जणां विरुद्ध लोहा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे बसस्थानक शाळा-महाविद्यालय -ट्युशन परिसरात टवाळकी करणाऱ्यावर कायद्यांचा धाक बसत असून, असा घटनेत कमालीची घट झाल्याचे दिसते आहे.
लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी आठ दिवसा पूर्वी लोहा शहरात रुजू झाल्या नंतर बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावली आहे. गणेश चतुर्थी दिवशी भाजी मंडई परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. पण यंदा विविध उपयुक्त पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्यांना व घरगुती गणेश मूर्ती विक्री करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना शिस्त लावली तसेच मुख्य रोडवर पोस्ट ऑफिस ते पहिली कमान या भागात रोडच्या कडेला दुचाकी पार्किंग व्यवस्थित लावलेली होती. त्याचा परिणाम वाहतूक कोंडी टाळली.गणेश चतुर्थी दिनी सकाळ पासूनच स्वतः पोलीस निरीक्षक चिंचोलकर व टीम दिवसभर रोडवर होते त्यामुळे बाहेरगावाहून शहरात गणेश मूर्ती खरेदीसाठी आलेल्याना वाहतुकीचा फटका यंदा बसला नाही.
शहरात अवैध धंदे, अवैध ट्राफिक,अवैद्य पार्किंग, अवैद्य हात गाडी,अवैद्य माल ठेवणे, टवाळक्या करणे असा विरुद्ध मोहीम सुरू आहे. शाळा महाविद्यालय-ट्युशन परिसरात मुलींची छेडछाड करण्याच्या हेतूने टवाळकी करणाऱ्या विनाकारण रोड फिरणारे, रोडवर गैरवर्तणूक करणारे रोड रोमिंयो, भाई दादा बॉस असा दहा जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 110,112,/117 प्रमाणे केसेस दाखल केल्या आहेत. लोहा पोलीस स्टेशन मध्ये शर्टाच्या गुंड्या मोकळ्या सोडून फिरणाऱ्या ४ जणां विरुद्ध मुंबई पोलीस अधिनियम प्रमाणे केसेस दाखल.करण्यात आल्या आहेत.
“मेरी मर्जी ” ….. आम्हाला काय कोणाची भीती …… असा अविर्भावात वागणाऱ्यावर पहिल्यांदाच कायद्यांचा बडगा उगरण्यात आला मुंबई पोलीस अधिनियम 1951 मध्ये .पोलीस स्टेशन हे एक सार्वजनिक आणि शिस्तीचे ठिकाण आहे.पोलीस स्टेशन मध्येच आपल्या शर्टाच्या गुंड्या मोकळ्या ठेवून असभ्य वर्तन करणाऱ्या लोकांवर झालेल्या कार्यवाहिमुळे टवाळकी करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत. पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्यामुळे शहराला शिस्ती लागते आहे. सिंघम २ अशी त्याची ओळख सर्वसामान्य जनतेला मोठा आधार देणारी ठरते आहे.