हिमायतनगर। औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित पंतप्रधान मंञी रन फाॅर स्किल( मॅरेथान)स्पर्धेचे झेंडी दाखवून आ. जवळगावकर यांनी प्रारंभ केला. या स्पर्धेत मुले 35 व 15 मुलीनी सहभाग घेतला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक संदीप यटलेवाड तिन हजाराचा मानकरी ठरला. तर द्वितीय नारायण मुदनवाड दोन हजाराचे बक्षीस मिळाले.तर तृतीय संजय राठोड एक हजाराचा मानकरी ठरला आहे.
मुलासारखेच बक्षीस मुलीना देण्यात आले. मुलीमध्ये प्रथम आरती राऊत, प्रथम, द्वितीय माया पोपलवार, तृतीय रेणूका गोरठकर आली. या प्रसंगी प्राचार्य सुनिल नंनवरे क्रिडा शिक्षिका माधूरी तामशेटवार आय.टी.आय.चे निदेशक यादव वाळके, आय.एम.सी..सदस्य अंबाराव वानखेडे, मार्केट कमेटीचे सभापती जनार्धन ताडेवाड, माजी.जि.प. सदष्य सुभाष राठोड, सुभाष शिंदे, शहराध्यक्ष संजय माने, गोविंद बंडेवार, अनंता देवकते,योगेश चिल्कावार, ज्ञानेश्वर शिंदे, माजी नगरसेविका पंचफुलाबाई लोणे, आदीसह हजर होते. या कार्यक्रमासाठी कर्मचारी निता भगत, अमोल गुंडाळे, अशोक डवरे आदीने परिश्रम घेतले.