वडगाव /पोटा,पांडुरंग मिराशे। पारवा बुद्रुक येथील अल्पभूधारक शेतकरी बालाजी भीमराव माने यांच्या घरी अचानक रात्री आठच्या सुमारास घरगुती गॅस सिलेंडरच्या झालेल्या स्फोटामध्ये जखमी झालेल्या पाच व्यक्ती आज दुसऱ्या दिवशी वच्छलाबाई भिमराव माने वय अंदाजे 75 वर्ष यांचे नांदेड येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे कुटुंबातील या घटनेत पाच व्यक्ती गंभीर रित्या होरपळले होते पाच पैकी दिनांक 17 सप्टेंबर रोजी दोन व्यक्तीचा आज दिनांक 18 सप्टेंबर रोजी एका व्यक्तीचा अशा एकूण तीन व्यक्तीचा मृत्यू. झाल्याची घटना घडल्याने गावावर सलग दुसऱ्या दिवशी शोक काळा पसरली आहे.
पारवा बुद्रुक येथील अल्पभूधारक शेतकरी बालाजी भीमराव माने यांच्या घरी दिनांक 17 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता घरगुती गॅस सिलेंडरच्या स्पोर्ट होऊन घटनेत जखमी झालेल्या पाच व्यक्ती पैकी दिनांक 18 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता बालाजी भीमराव माने कुटुंबप्रमुख व राधाबाई बालाजी माने या दोघा पती-पत्नीचा दरम्यान प्रथम झाला होता यांच्या मृत्यूच्या घटनेने गावावर व परिसरावर सुखकळा पसरली होती दिनांक 18 सप्टेंबर रोजी सव्वाचार वाजता दोघेही पती-पत्नीवर एकाच सरणावर अंत्य विधी करण्यात आला 75 वर्षे वय असलेल्या पित्यानात नामे भीमराव पाटील माने यांनी मुलगा व शुभेच्छा सरणाला मुखांनी दिला.
हे दृश्य बघून उपस्थित हजारो जनसमुदायांचा आसवांचा बांध फुटला मोठ्या दुःखी अंतकरणाने अंत्यविधी करण्यात आला तर दिनांक 18 सप्टेंबर रोजी त्यांची आई वत्सलाबाई भीमराव माने यांचाही उपचारात दरम्यान मृत्यू झाला आहे त्यांच्याही प्रेताचा मोठ्या जड अंतकरणाने गावकऱ्यांनी व असंख्य नागरिकांनी नातेवाईकानी अंत्यविधी करण्यात आला. सलग दोन दिवस दुःखद घटनेमुळे गावावर व परिसरात दुःखाची छाया पसरली असून कुटुंबातील या दुर्दैवी घटनेत गंभीर जखमी झालेले आणखी दोन व्यक्ती नांदेड येथील आधार हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू असल्याची खात्रीलायक वृत्त त्यांच्या नातेवाईकांनी दिले आहे.