नांदेड। येथील सत्यशोधक विचार मंच आणि फुले आंबेडकर विचारधारा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंबेडकरी विचारवेध परिषदेत जुन्या नव्या कवींची विद्रोही काव्यमैफिल चांगलीच रंगली. नवोदितांनी आपल्या कवितांनी विद्रोहाचा आगाज केला. काव्यमैफिलीच्या अध्यक्षस्थानी सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्य उपाध्यक्ष ज्येष्ठ कवी पांडूरंग कोकुलवार हे होते तर अतिथी कवी म्हणून शरदचंद्र हयातनगरकर, उषा ठाकूर, पंडित पाटील बेरळीकर, प्रल्हाद घोरबांड, चंद्रकांत कदम, साईनाथ रहाटकर, आंबेडकरी विचारवेध परिषदेचे संयोजक मनोहर पवार, सहसंयोजक सुरेश हटकर, स्वागताध्यक्ष एन. डी. गवळे, निमंत्रक डॉ. साहेबराव ढवळे, संयोजन समितीचे अध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, जी. पी. मिसाळे, दिगांबर मोरे, राज गोडबोले, मारोती कदम आदींची उपस्थिती होती.
शहरातील कुसुम सभागृहात संपन्न झालेल्या राज्यस्तरीय आंबेडकरी विचारवेध परिषदेच्या उद्घाटनपूर्व सत्रात काव्यपौर्णिमा-७५ या अंतर्गत विद्रोही कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या काव्यमैफिलीत अशोक चवरे , एन. सी. भंडारे, प्रल्हाद घोरबांड , शरदचंद्र हयातनगरकर, चंद्रकांत कदम, साईनाथ रहाटकर, पंडित पाटील बेरळीकर , संजय स्वामी , गणपत माकणे , बाबूराव पाईकराव, एन. आर. वाठोरे , प्रकाश ढवळे नागलगांवकर, प्रा. डॉ. हेमंत सोनकांबळे, ॲड. दीपा सोनकांबळे, रुपाली वागरे वैद्य, उषा ठाकूर, नागोराव डोंगरे, रणजीत गोणारकर, अनुरत्न वाघमारे , कैलास धुतराज, राज गोडबोले, शाहीर तुकाराम हटकर, मारोती कदम, शंकर गच्चे यांनी एकापेक्षा एक सरस आणि दमदार कवितांचे सादरीकरण करुन रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. अध्यक्षीय समारोप पांडूरंग कोकुलवार यांनी केला.
कुसुम सभागृहात सहभागी कवी कवयित्रींनी विद्रोहासह विविध काव्यरसांची उधळण करीत रंगत आणली. कवितेच्या सादरीकरणानंतर सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने गुलाबपुष्प आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. काव्यपौर्णिमेचे बहारदार सुत्रसंचालन विद्रोही स्तंभलेखक मारोती कदम यांनी केले तर आभार शीघ्रकवी कैलास धुतराज यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रज्ञाधर ढवळे जी.पी. मिसाळे, डॉ. रामचंद्र वनंजे, एन.टी. पंडीत, संजय जाधव, विजय सोंडारे, अनिलकुमार कांबळे, रमेश कसबे, नितीन एंगडे, मारोती कदम, एम.डी. जोंधळे, रुपाली वागरे, आर.पी. कोकलेगावकर, राहुल गवारे, चेतन भुजबळे, एन.एम. झडते, शोभाताई कोकरे, अनिता गोडबोले, नागोराव डोंगरे, पी.के. खानापूरकर आदी परिश्रम घेत आहेत.