मुखेड| मुखेड तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या बार्हाळी,येवती,एकलारा,जाहुर,अंबुलगा या मंडळात 200 मिमि पेक्षा जास्तीचा पाऊस होवुन ढगफुटीने झालैल्या प्रचंड नुकसानीची तात्काळ मदत देण्याचे मुख्यमंञ्यानी जाहीर करुन शासनादेश काढण्यात आला होता. पण अद्यापही पुरग्रस्तांना मदत मिळाली नसल्याने शेतकरी पुञ संर्घष समिती आक्रमक होत धरणे धरण्याचा इशारा विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी यांना दिल्यानंतर यांची तात्काळ दखल घेत तहसिलदार राजेश जाधव यांनी शेतकरी पुञ संर्घष समितीच्या पदाधिकारी पुरग्रस्ताना घेवुन आंदोलकाची मिटींग घेतली.
येवती,पाळा,कोळनुर यासह अनेक गावातील पुरग्रस्ताना चेक वाटप करुन वापस घेतल्याचा गंभीर प्रकार घडुनही अद्यापही पुरग्रस्ताना मदत मिळाली नसल्याने वापस घेतलेल्या लाभ्यार्याना तात्काळ खात्यावर रक्कम वर्ग करणार असल्याचे तहसिलदारांनी सांगीतले.गेल्या अनेक दिवसापासुन पंचनामे होवुन पण शेतकर्यांच्या दुष्काळी सर्व्हेच्या याद्या गावोगावी लावण्यात आले नसल्याने शेतकरी चिंतेत होते. यावेळी या मागणीची तात्काळ दखल घेत खरडुन गेलेले वेगळे व पिक नुकसानीच्या वेगळे याद्या गावागावातील चावडीत चिकटवण्याचे तात्काळ आदेश संबधित नोडल अधिकार्याना तहसिलदार राजेश जाधव यांनी दिले.
याबरोबरच मुखेड तालुक्यात मिड अडवायझरी सिझन लागु करण्याबाबत ही प्रभारीराज असलेले तालुका कृषि अधिकारी चालढकल करत असल्याने त्यांना तंबी देवुन पंचनामे करण्याचे सांगण्यात आले.यावेळी शेतकरी,पुरग्रस्त नागरीक मोठ्या संख्येने होते.तहसिलदार राजेश जाधव यांनी पुरग्रस्त जास्तीचे आल्याने कार्यालयाबाहेर येत निवेदन स्विकारले.यावेळी बालाजी पाटील सांगवीकर,बालाजी पाटील ढोसणे,रमेश झाडे,बंडु पाटील उंद्रीकर,दिलीप सुगावे,अहमद शेख,माधव देवकत्ते,गजानन बोडके यासह शेकडो पुरग्रस्त उपस्थितीत होते.