हिमायतनगर। शहरातील नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रं. 12 (परमेश्वर गल्ली) मध्ये पाणी पुरवठा करणारा कर्मचारी हा पाणी व्यवस्थीतरित्या व नियमित सोडत नसल्याने ऐन सणासुदीच्या काळात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे. अशी तक्रार पत्रकार अनिल नाईक यांनी दिली आहे.
देण्यात आलेल्या तक्रार अर्जात म्हंटलं आहे की, नगर पंचायत हिमायतनगरच्या पाणी पुरवठा विभागाकडुन न्यायालयाजवळील विहिरीवरुन नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यांत येतो. परंतु आता भरपुर पावसाळा असुन, सुध्दा नियमित व व्यवस्थीतरित्या पाणी पुरवठा सोडणे बंधनकारक असतांना सुध्दा तो कधी चार दिवसाला तर कधी पाच दिवसाला पाणी सोडत आहे.
यासाठी काम करणारा कर्मचारी जाणीवपूर्वक पाणी सोडण्यात कुचराई करत आहे, त्याचा मोबाईल सुध्दा हा कायम बंदच असतो. तो आमच्याच पाईप लाईन वर असलेल्या दुसऱ्या भागात नियमितरित्या पाणी सोडत आहे. परंतु आमच्या वॉर्ड क्रमांक 12 गल्लीत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. लाईट गेल्यावर तो कोणत्याही प्रकारे येवुन चौकशी करीत नसतो, नळाला पाणी येत आहे किंवा नाही याची खबरदारी सुध्दा तो घेत नाही.
त्याकरीता त्वरीत अशा मुजोर आणि सणासुदीला पाणी पुरवठा करण्यात मनमानी कारभार करणाऱ्या कर्मचाऱ्याची तात्काळ चौकशी करुन त्यास सक्त ताकीद देवुन नियमितपणे पाणी पुरवठा करण्यांत यावा. कारण सध्या सणासुदीचे सण असुन, पाण्यासाठी गल्लीतील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. असे कार्यालय अधिक्षक नगर पंचायत हिमायतनगर जि. नांदेड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, या निवेदनावर तक्रारदार अनिल दत्ता नाईक रा. परमेश्वर गल्ली, हि. नगर ता. हि. नगर जि. नांदेड यांची स्वाक्षरी असून, यावेळी सामाजीक कार्यकर्ते विलास वानखेडे, शुद्धोधन हनवते व अनेकांची उपस्थिती होती.