लोहा| शहरात व परिसरात बेशिस्त पार्कींग दुचाकी वाहनांवर दादा-काका, मामा, भाऊ असे सर्रास लिहिले असते.आम्हाला काय कोणाची भीती अशा अविर्भावात नियमाची पायमल्ली केली जात होती परंतु पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी स्वतः त्याच्या टीम सोबत रस्त्यावर उतरून दुचाकवरील फॅन्सी प्लेट नंबर असलेल्या वाहनांवर। कार्यवाही केली यात १० वाहने जप्त व एकाच दिवसात १८३ वाहनांना ८१ हजार ५०० रुपयांचा दंड आकारला त्यामुळे विना लायसन्स व वाट्टेल तशी नंबर प्लेट लावून वाहन चालविणाऱ्याना धडकी भरली आहे.
लोहयाचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी पदभार स्वीकारल्या नंतर दहा दिवसात शहरातील पार्कींग वाहतुकी वठणीवर आली आहे.दररोज चार पाच तास स्वतः पोनि चिंचोलकर व त्याची टीम रस्त्यावर असते .नियमबाह्य असलेल्याना ते कायद्याची माहिती सुद्धा देत असतात बुधवारी शहरातील सर्व महत्त्वाच्या चौकामध्ये वाहने चेकिंग करण्यात आली.ज्या वाहनावर फॅन्सी नंबर प्लेट उदा. दादा काका मामा पाटील बॉस काही शायरी अशा वाहनावर सक्त कारवाई केली काही वाहने जप्त करण्यात आली. ज्या बुलेटचे सायलेन्सर चा आवाज मोठा आहे ज्या बुलेट फटाकड्या फोडतात अशा बुलेट जप्त करून पोलीस स्टेशनला लावण्यात आल्या .
रोडवर अस्ताव्यस्त टू व्हीलर फोर व्हीलर पार्क केलेल्या त्यावरव दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे. अल्पवयीन मुलांनी गाडी चालविणे अशा वाहनधारकांवर कायद्यांचा बडगा उगरण्यात आला आहे पूर्वी अशी कोणतीही कार्यवाही होत नसे .आज बुधवारी झालेल्या या मोहिमेत 163 वाहनांवर कारवाही करण्यात आली त्यातून 81 हजार ,500 रुपयाचा दंड आकरण्यात आला तर 10 वाहने जप्त करण्यात आले.लोहा पोलीसा कडूनन अतीक्रमनधारका विरुद्ध कारवाई सुरू असतानाच आता बेकायदेशीर वाहनधारकावर विरुद्ध मोहिम सुरू आहे पोलीस निरीक्षक श्री चिंचोलकर यांच्या कार्यपध्दतीचे सामान्य जनतेलासमाधान वाटत असून त्याच्या कामाची प्रशंसा करीत दररोज शहर वासीय त्याचा सत्कार करत आहे. या कार्यवाहीत पोलीस निरीक्षक चिंचोलकर, पोउनि हालसे, लातूर ट्रेनिंग सेंटर चे पोलीस अंमलदार व होमगार्ड यांचा समावेश होता