लोहा। शहरातील सर्वात मोठे कुटुंब असलेल्या पारेकर परिवारातील स्व.मधुकर नारायण पारेकर यांच्या प्रथम स्मृती निमित्ताने अनाठायी खर्चाला फाटा देत पारेकर कुटुंबीयांनी शिव छत्रपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना माजी आ रोहिदासराव चव्हाण , कोषाध्यक्ष श्रीकांत पाटील, सेवानिवृत्त उपअभियंता प्रभाकर पारेकर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
विद्युत वितरण कंपनीतील सेवानिवृत्त अभियंता स्व मधुकर नारायण पारेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त लोह्यातील शिव छत्रपती विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप माजी आ रोहिदास चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले .
यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष श्रीकांत पाटील, पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त उपकार्यकरी अभियंता प्रभाकर पारेकर , मुख्याध्यापक दामोदर वडजे, ज्येष्ठ रंगकर्मी रत्नाकर पारेकर, बालाजी पारेकर, मुख्याध्यापक एच जी पवार,भारत पारेकर, गिरीश पारेकर, गोविंद ढगे, श्रीमती सरोजा पारेकर, श्वेता पारेकर यासह शाळेतील शिक्षक -कर्मचारी उपस्थित होते.आर आर पारेकर यांच्या पुढाकाराने अनाठायी खर्चाला फाटा देत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला व पुढेही असाच उपक्रम सुरू ठेवण्याचे जाहीर केले.
स्व.मधुकर पारेकर व पारेकर कुटुंबाच्या कार्याचा गौरव माजी आ रोहिदास चव्हाण यांनी केला .सेवानिवृत्त उपअभियंता प्रभाकर पारेकर यांनी त्यांच्या बंधूंच्या आठवणी सांगितल्या.मुख्याध्यापक दामोदर वडजे ,हरिहर धुतमल यांनी मनोगत व्यक्त केले आयोजक राहुल पारेकर यांनी काका मधुकर यांच्या आठवणी प्रास्ताविकात सांगितल्या. अतिशय सुरेख संचलन बालाजी गवाले यांनी तर आभार आर आर पिठ्ठलवाड यांनी मानले.