लोहा। डॉ बी आर आंबेडकर फाउंडेशन नांदेड च्या वतीने दिला जाणारा पहिला प्रज्ञावंत विद्यार्थी पुरस्कार लो प्रतिकूल परिस्थितीतुन बायोटेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी करणारा लोह्याचा विद्यार्थी सिद्धांत दिलीप महाबळे याना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक माजी खा प्रा जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र, सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले .हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सोहळा फाउंडेशन चे संस्थापक पी आर पी चे प्रदेश सचिव नगरसेवक बापूराव गजभारे यांच्या वतीने आयोजित भीम महोत्सवात हा पुरस्कार सोहळा पार पडला.
भीम महोत्सवाचे आयोजन पी आर पी चे प्रदेश सचिव व माजी नगरसेवक बापूराव गजभारे हे दरवर्षी पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्याना भव्य समारंभात ” कृष्णाई” पुरस्कार देऊन सन्मानित करतात . यंदा स्मृतिशेष मनोज नागोराव गजभारे यांच्या नावे दिला जाणार पहिला प्रज्ञावंत विद्यार्थी पुरस्कार लोहा येथील सिद्धांत दिलीप महाबळे या विद्यार्थ्यांना माजी खा प्रा जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.सिद्धांत याच्या घरची परिस्थिती प्रतिकूल आहे .
तो लहान असतानाच वडिलांचे छात्र हरवले त्याच्या आईने शिवणकाम करून त्याला व शिकविले . मामा पोलीस जमादार बाबुराव हटकर यांनी त्याचे व बहिणीचे सर्व शिक्षण केले बहिणीचे लग्न करून दिले.सिद्धांत हा बायोटेक्नॉलॉजी मध्ये स्वाराती मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे पी.एचडी करीत आहे त्याची नगरसेवक बापूराव गजभारे यांनी निवड केली व होतकरू विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याची सामाजिक दायित्व स्वीकारले आहे
.सिद्धांत याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या सोहळ्याला माजी खासदार सुभाष वानखेडे, भदंत डॉ उपगुप्त महाथेरो, भदंत पैय्याबोधी महाथेरो, ह भ प वाबळे महाराज आळंदीकर, प्रसिद्ध गायक अनिरुद्ध बनकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्ण, पी आर पी चे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूराव गजभारे, पीआरपीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, बालाजीराव शिंदे, शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, सुरेंद्र घोडजकर, आयोजक आकाश गजभारे, स्वागत अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे, पी आर पी चे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख यासह सिद्धांत यांचे आई , मामा, व नातेवाईक उपस्थित होते.