नायगाव, रामप्रसाद चन्नावार| नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाणे अंतर्गत नवीन महिला दक्षता समितीची निवड पदाधिकाऱ्याची निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्ष म्हणून रेखाताई अनिल कांबळे व बाकी सर्व परिसरातील सर्व सदस्यांची यावेळी सदस्य म्हणून पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली .कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 20 /9 /2023 रोजी कुंटूर येथील पोलीस ठाण्यामध्ये महिला दक्षता समिती पदाधिकाऱ्याची निवड करण्यात आली.
यावेळी विशाल बहात्तरे पोलीस निरीक्षक कुंटुर, स .पो. उप. संजय आटकुरे, पोलीस उपनिरीक्षक कुसुमे ,पोलीस उपनिरीक्षक कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एकूण 45 गावातील महिला सदस्य उपस्थित होत्या .45 गावातील महिला उपस्थित यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना विशाल बहात्तरे , म्हणाले की महिला न घाबरता तक्रार करण्यासाठी पुढे येतील पोलिसांना दक्षता समितीच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचण्यास मदत होईल गुन्हेगारी कमी करण्यासाठी एकत्र येऊन काम करता येईल सुशिक्षित महिला पुढे आल्या तर समाजातील इतर महिलांना प्रोत्साहन मिळेल असे उदगार विशाल बहात्तरे यांनी यावेळी काढले .
महिला दक्षता समितीच्या माध्यमातून कौटुंबिक वाद, आणि कलह समुपदेशन करून महिलाचा अडीअडचणी सोडवण्यासाठी काम केले जाईल असे मत रेखाताई कांबळे कुंटुरकर महिला दक्षता समितीचे अध्यक्ष यांनी सांगितले . पोलीस निरीक्षक बहात्तरे यांनी सर्व महिला सदस्याचे प्रथम स्वागत केले . महिला समिती पोलीस एकत्र मिळून काम केल्यास महिला वरील अत्याचारास प्रमाण कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दक्षता समितीचे अध्यक्ष रेखाताई कांबळे कुंटुरकर यांनी महिला व पोलीस यांच्या बरोबर राहून काम करू असा विश्वास दाखवला आहे. यावेळी अध्यक्ष रेखाताई अनिल कांबळे ,मधुताई काकडे सदस्य कुसनूर ,अश्विनी जाधव सदस्य सातेगाव ,मीरा झगडे सदस्य राजगड नगर , जनाबाई शिंदगे सदस्य बरबडा, रंजना गुंटे , सदस्य सोमठाणा , वंदना राक्षसमारे मांडणी , शुभांगी तोडे अंतरगाव, सोनाली पेदे शेळगाव छत्री, शिल्पा हनुमंते कुंटूर ,संगीता मिसाळे सालेगाव आम्रपाली वाघमारे रुई बुद्रुक ,सुरेखा हेंडगे काहाळा, ललिता पटेकर घुंगराळा व आदी महिला व पोलीस व पोलीस मित्र यावेळी उपस्थित होते.