नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत “क” झोन व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन कै.वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालया मार्फत यशस्वीपणे करण्यात आले. व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटक म्हणून स्वारातीम नांदेडचे माजी क्रीडा संचालक डॉ.विठ्ठलसिंह परिहार हे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.मझरोद्दीन खलिलोद्दीन हे होते.

यावेळी मंचावर प्राचार्य डॉ.उस्मान गणी,निवड समिती अध्यक्ष डॉ.विक्रम कुंटूरवार,कझोन सचिव डॉ.महेश वाखरडकर, डॉ.बालाजी जाधव,डॉ. किरण येरावार,डॉ.मनोज पैंजणे,डॉ.बळीराम इंगळे,डॉ. अश्विन बोरीकर,इम्तियाज खान यांची उपस्थिती होती.या स्पर्धेत ‘क’झोन मधील एकूण 13 महाविद्यालयाच्या संघांनी सहभाग नोंदवला. मुलांमध्ये प्रथम क्रमांक शारीरिक शिक्षण महाविद्यालय,कौठा नांदेड,द्वितीय श्री.गुरुगोविंदसिंघ अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेड तर तृतीय क्रमांक यशवंत कॉलेज, नांदेड यांनी पटकावला.
मुलींमध्ये श्री. गुरुगोविंदसिंघ अभियांत्रिकी महाविद्यालय प्रथम,बळीराम पाटील महाविद्यालय किनवट द्वितीय तर तृतीय क्रमांक सायन्स कॉलेज नांदेड यांनी मिळवला.पंच म्हणून कासिम खान,पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी क्षीरसागर,अजिंक्य पवार,साजिद खान,प्रशांत आळणे,सय्यद अब्बास यांनी काम पाहिले.पारितोषिक वितरण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर तुळशीराम पवार महाविद्यालय हाडोळती चे प्राचार्य डॉ. दीपक बच्चेवार हे होते. व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन कै.वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय,देगलूर नाका नांदेड द्वारे करण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ.दिलीप माने, डॉ.फुलारी सर,डॉ.गजानन कदम,डॉ.राहुल सरोदे,डॉ.छाया कोठे,डॉ.सीमा सबनीस यांनी सहकार्य केले तर संयोजक म्हणून प्राचार्य डॉ.उस्मान गणी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.सय्यद वाजिद, प्रा.डॉ.बाबासाहेब भुक्तरे,प्रा. मोहम्मद दानिश,प्रा.शेख नजीर शेख पाशामियाॅं,प्रा.अक्षय हासेवाड,मो.मोहसिन,शेख फुरखान यांनी विशेष परिश्रम घेतले.