कंधार,सचिन मोरे। लाकडी गौरी पुजनांच्या पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या परंपरेचा त्याग करत आपल्या तीन सुनांचे विधिवत पुजन करत त्यांच्या यथायोग्य सन्मान करत लाकडाच्या गौरी ऐवजी माझ्या तीन सुनांच माझ्या जिवंत गौरी आहेत. असा संदेश माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र येईलवाड यांनी एका कार्यक्रमातून दिला आहे .
प्राचीन काळापासून भारतामध्ये अनेक सण उत्सव मोठ्या उत्सहात साजरे केले जातात त्यात गौरीपूजन हा सण सर्वत्र मोठ्या हर्ष उल्हासात,जल्लोशात साजरा करण्यात येतो हिंदू धर्मांमध्ये गौरी पुजनाचे आगळे वेगळे महत्व आहे या गौरी पुजनांच्या रूढी परंपरेला कंधार येथील माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र येईलवाड यांनी छेद देत आपल्या तिनही सुनांना लक्ष्मीचे रूप मानत त्यांचे गौरी पुजनाच्या दिवशी विधीवत पुजा केली खणा नारळांनी ओटी भरत त्यांची सर्व कुटुंबाने मिळून पूजा करून तीन ही सुनांचे दर्शन घेतले या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कंधार शहरातील शहाजी नगर येथे गेल्या तीस वर्षापासुन राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते रामचंद्र येईलवाड हे वास्तव्यास आहेत त्यांनी अनेक वर्षे शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने,रास्तारोको केले एक लढवय्या कार्यकर्ता अशी त्यांची वेगळी ओळख आहे गेल्या दोन वर्षा पासुन ते गौरी पुजना ऐवजी सुनांचे सन्मान करीत आहेत या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे.
या उपक्रमामध्ये त्यांनी वर्षा सुदर्शन येईलवाड,प्रतिभा शशिकांत येईलवाड,मनीषा, राजकुमार येईलवाड यांचा सन्मान करत त्यांचे गौरी पुजन केले या वेळी कमलाबाई येईलवाड, सुखदेव येईलवाड, माजी सभापती बापूराव पा. गौंड पद्मिनबाई येईलवाड, गंगाधर येईलवाड ,विनायक येईलवाड,सुनंदा येईलवाड,अंकुश येईलवाड,सुदर्शन येईलवाड, भास्कर येईलवाड यांची उपस्थिती होती.
सुनांच माझ्या लेकी…..!
गेल्या पन्नास वर्षांपासुन आमचा कुटुंबात येईलवाड घराण्यामध्ये एकत्र कुटुंब पद्धती असुन कुठलेच मतभेद नाहीत माझ्या तीन ही सुना मला लेकी प्रमाणे असुन त्या अहोरात्र कष्ट घेतात त्यामुळेच कुटुंबाचा विकास होतो सासु आणि सुना अशी दरी आमच्या कुटुंबामध्ये कधी निर्माण होणार नाही माझ्या सुनाच खऱ्या लक्ष्मी आहेत त्यामुळेच त्यांचा गौरव करत आम्ही दरवर्षी पूजन करतो असे कमलबाई रामचंद्र येईलवाड (सासु) यांनी सांगितले.