मुखेड/नांदेड। मुखेड तालुक्यातील ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय,वसंतनगर (कोटग्याळ) ता. मुखेड जि. नांदेड, प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने दरवर्षी रांगोळी स्पर्धा घेण्यात येते, या वर्षी ही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचा वर्धापन दिन व मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधुन ही स्पर्धा अतिशय आनंददायी वातावरणात पार पडली.
प्राचार्य डॉ. हरिदास राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली व विभाग प्रमुख. प्रा. डॉ. श्रीनिवास पवार यांच्या सहकार्याने व प्रा. डॉ. महेश पेंटेवार यांच्या संकल्पनेतून वरील ऑनलाइन रांगोळी स्पर्धेचे आयोजन दि. १७.०९.२०२३ रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या राज्यातील नांदेड, लातूर, परभणी, कोल्हापूर, नाशिक, नॉर्थ गोवा, छत्रपती संभाजीनगर, पुणे, बीड व बेल्लारी या जिल्ह्यातील एकुण ९३ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता.
रांगोळी स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी डॉल्फिन, ब्ल्यू व्हेल, टुना फिश, टर्टल, गोल्डन फिश, कोई फिश जेली फिश, झायगिना, ऑक्टोपस, युग्लीना, प्यारामोशीयम, शार्क, पेंग्विन, स्टार फिश, स्पंज, हायड्रा, क्लाऊन फिश, शंख इत्यादी जलचर प्राण्यांच्या विविध रंगांचा वापर करून रांगोळी साकारल्या होत्या.
प्रत्येक जलचर प्रजाती आम्हाला दररोज सुलभ, निरोगी आणि अधिक उत्पादनक्षम बनविण्यात मदत करण्यासाठी भिन्न भूमिका बजावते. ते वातावरणाचा दाब आणि जागतिक हवामान बदलास देखील मदत करतात. जलचर हा शब्द गोड्या पाण्यात किंवा खाऱ्या पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना लागू केला जातो. तथापि, सागरी हे विशेषण सामान्यतः खाऱ्या पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांसाठी वापरले जाते.
जलचर प्राणी विशेषत: गोड्या पाण्यातील प्राणी त्यांच्या वातावरणाच्या नाजूकपणामुळे संरक्षकांसाठी विशेष चिंतेचा विषय असतात . जलचर प्राण्यांवर जास्त मासेमारी , विध्वंसक मासेमारी , सागरी प्रदूषण , शिकार आणि हवामानातील बदल यांचा दबाव असतो. अनेक अधिवास धोक्यात आहेत ज्यामुळे जलचरांनाही धोका आहे. जलचर प्राणी जगामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. जलचर प्राण्यांची जैवविविधता अन्न, ऊर्जा आणि रोजगार देखील प्रदान करते. ताजे पाणी जलीय जीवांसाठी हायपोटोनिक वातावरण तयार करते. हे काही जीवजंतूंसाठी समस्याप्रधान आहे ज्यांच्या त्वचा किंवा गिल झिल्ली आहे, ज्यांच्या सेल झिल्ली जास्त पाणी उत्सर्जित न केल्यास फुटू शकतात.
काही प्रोटिस्ट हे संकुचित व्हॅक्यूओल्स वापरून पूर्ण करतात , तर गोड्या पाण्यातील मासे मूत्रपिंडाद्वारे जास्तीचे पाणी उत्सर्जित करतात. जरी बहुतेक जलचरांमध्ये त्यांचे ऑस्मोटिक संतुलन नियंत्रित करण्याची मर्यादित क्षमता असते आणि म्हणूनच ते फक्त खारटपणाच्या अरुंद श्रेणीतच राहू शकतात, डायड्रोमस माशांमध्ये ताजे पाणी आणि खारट दरम्यान स्थलांतर करण्याची क्षमता असते.जल संस्था या स्थलांतरादरम्यान बदललेल्या क्षारांच्या सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी ते बदल घडवून आणतात, या प्रक्रिया हार्मोनली नियंत्रित आहेत. युरोपियन ईल ( अँगुइला अँगुइला ) प्रोलॅक्टिन संप्रेरक वापरते , तर सॅल्मन ( साल्मो सालार ) मध्ये या प्रक्रियेदरम्यान कॉर्टिसॉल हार्मोन महत्त्वाची भूमिका बजावते. गोड्या पाण्यातील मोलस्कमध्ये गोड्या पाण्यातील गोगलगाय आणि गोड्या पाण्यातील द्विवाल्व्ह यांचा समावेश होतो . गोड्या पाण्यातील क्रस्टेशियन्समध्ये गोड्या पाण्यातील खेकडे आणि क्रेफिश यांचा समावेश होतो.
या स्पर्धेच्या आयोजनाचा प्रमुख उद्देश हा होता की विद्यार्थी जो विषय शिकतो याबद्दलची जागृकता निर्माण व्हावी व याबरोबरच जलचर प्राण्यांची ओळख त्यांचे महत्त्व व संगोपन कसे करावे याबद्दलची जाणीव त्यांच्या मनामध्ये रुजविण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते. कारण जलचर प्राणी हे परिसंस्थेमध्ये खूप महत्त्वाचे कार्य करतात. त्यांचे योगदान खूप मोठे असते. म्हणूनच उपरोक्त ऑनलाइन रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु.बागुल कल्याणी रविंद्र, महाराजा सयाजीराव गायकवाड कॉलेज मालेगाव,नाशिक हिने पटकावला तर द्वितीय क्रमांक ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, परभणी ची विद्यार्थिनी कु.कदम वैष्णवी केशवराव हिने पटकावला,तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात आले त्यात आर.बी.मदखोलकर महाविद्यालय चांदगड, कोल्हापूरची विद्यार्थिनी कु.गावडे वंदना वसंत व दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातुरची विद्यार्थिनी भोसले आकांक्षा बाळासाहेब हिने पटकावला.
या स्पर्धेतील गुणवंताना ई-प्रमाणपत्र व रोख रक्कम प्रथम १०००, द्वितीय ७००, व तृतीय ५०० प्रत्येकी देवुन सन्मानित करण्यात आले. संस्थेचे सचिव प्राचार्य गंगाधररावजी राठोड, मुखेड-कंधार विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉ. तुषारजी राठोड, जि.प.सदस्य मा.संतोषजी राठोड, प्राचार्य डॉ.हरिदास राठोड, उपप्राचार्य अरुणकुमार थोरवे,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा. बळीराम राठोड, प्रसिद्धी प्रमुख प्रो.डॉ. रामकृष्ण बदने .नॅकचे समन्वयक प्रो.डॉ. उमाकांत पदमवार यांनी सर्व स्पर्धक व विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.श्रीनिवास पवार, संयोजक प्रा.डॉ.महेश पेंटेवार,परिक्षक प्रो.डॉ.गुरुनाथ कल्याण श्री.नागेश सोनकांबळे श्री.शौकत शेख व सर्व सहभागी स्पर्धक यांच्या प्रयत्नामुळे रांगोळी स्पर्धा यशस्वीपणे पार पडली.