नांदेड। स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या वतीने व्यावसायिक सामाजिक जवाबदारीच्या अंतर्गत शहरातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडल मध्यवर्ती बसस्थानकास पाचशे लीटर क्षमता असलेले शुद्ध फिल्टर पिण्याच्या पाण्याचे प्लांट मराठवाडा मुक्ति संग्राम दिनाचे औचित्य साधुन देण्यात आले.
आरो फिल्टरच्या माध्यमातून तासी पाचशे लीटर शुद्ध पिण्याचे पाणि मिळणार आहे. शहरातील बस स्थानकामधे मोठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करतात त्यांना पिण्याचे पाणि आवश्यक असते या उद्देशाने प्रवासी यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या करिता पिण्याचे शुद्ध पाणि प्लांट देण्यात आले.
सदरिल कार्यक्रमा प्रसंगी स्टेट बैंक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक पक्काला कालिदासु यांच्या हस्ते शुद्ध पिण्याच्या पाण्याचे प्लांटचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी स्टेट बैंक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक एस.श्रीधर, राजीव कदम,क्षेत्रीय सचिव आदित्य सेनगांवकर, विदेशी मुद्रा अधिकारी मनोजकुमार वाघदरीकर, कार लोन अधिकारी अभिजीत देवके,उपशाखा प्रबंधक दुलाल मंडल हे प्रामुख्याने उपस्तित होते. या कार्यक्रमा प्रसंगी एसटी महामंडळचे विभागीय नियंत्रक दत्तात्रय कुलकर्णी,विभागीय वाहतूक अधीक्षक संदीप सांळूके यांच्या प्रमुख उपस्तितित कार्यक्रम संपन्न झाला.