हिमायतनगर, दत्ता शिराणे। तालुक्यात गेल्या वर्षी सन २०२१ २०२२ या अर्थिक वर्षात अतिवृष्टीने खरिपाच्या पेरणीतील पिकांचे अतोनात नुकसान झाले. निकट भविष्यातील हानीचा वेध लक्षात घेवून शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणात विमा उतरविला. परंतु विमा कंपनीने शेतकऱ्याची दिशाभूल केली आहे. प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन तात्काळ पिक विमा शेतकर्यांना द्यावा. अशी मागणी करण्यात आली आहे.
तालूका दंडाधिकाऱ्यांमार्फत शासनाला दिलेल्या निवेदनात नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, मागील वर्षी सन २०२१ – २०२२. पावसाने खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. या अगोदर शेतकऱ्यांनी विमा कवच म्हणून विमा उतरविला. परंतू विमा कंपनीने शेतकऱ्यांना आजपर्यंत फक्त झुलवत ठेवले आहे. शासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा समस्त नुकसान ग्रस्त शेतकरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहोत. असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर शेतकरी नेते प्रल्हाद पाटील, डाॅ. प्रकाश वानखेडे, पांडुरंग पाटील, संजय माने,कल्याण वानखेडे, रामभाऊ सुर्यवंशी, अशोक शिरफूले, वामनराव पाटील, सुनील पतंगे, मदनराव पाटील, श्रिदत्त पाटील, विनायक देवराये, संतोष आडे, दिनेश राठोड, मुन्ना शिंदे, मारोती गायकवाड, बंडू शिंदे, दिनानाथ महाराज, शिवाजी पाळजकर, पंडीत ढोणे आदींसह असंख्य शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.