नायगाव, रामप्रसाद चन्नावार। ‘मेरी माटी, मेरा देश’ कार्यक्रमानिमित्त नायगाव नगरपंचायतीच्या वतीने काढण्यात आलेल्या अमृत कलश यात्रेला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला असून. या अमृत कलश यात्रेत शहरातील नागरिकांनी सहभागी होऊन माती संकलीत करून अमृत कलश मध्ये जमा केली.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘मेरी माटी, मेरा देश’ मधील अमृत यात्रा हा देशभक्तीचा उपक्रम आहे. अमृत कलश यात्रेला नायगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी तथा तहसीलदार श्रीमती मंजुषा भगत यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. याचे महत्वपूर्ण कार्यक्रमात शहरातील हजारो नागरिक व शहरातील जि.प. हायस्कूल मुलीचे कन्या नायगाव येथील शाळांनी सहभाग नोंदविला होता.
सदर रॅली यशस्वी करण्यासाठी नगरपंचायतीचे कार्यालयीन अधीक्षक संतराम जाधव. रामेश्वर बापुले.श्रीधर कोलमवार. भगवान पाटोदे. सुमंत देबडवार. संभाजी भालेराव. गणेश चव्हाण. रमेश चव्हाण. मुन्ना मंगरुळे .भीमा गोंवदे. श्रीकांत वडगावकर. श्रीकांत शिरोळे. उमेश चव्हाण. खुशाल सालेगाये. धनराज वरने. बालाजी बोईनवाड. उमेश कांबळे. अजय सूर्यवंशी. लालबा भेंडेकर. प्रथमेश भालेराव. संगीता सरोदे. यांच्यासह कन्या शाळेचे सर्व शिक्षक वृंद विद्यार्थिनी व नगरपंचायत चे सफाई कामगार व सर्व कर्मचारी उपस्थित होते.