नवीन नांदेडl सिडको परिसरातील मुख्य मिरवणुकीत बळीरामपुर येथील गणेश मंडळ यांनी साकारलेल्या शिवपार्वती विवाह सोहळा व शहीद भगतसिंग यांच्या चारित्र्यावर आधारित देखावा पाहण्यासाठी सिडको परिसरातील मुख्य रस्त्यावरील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या ग्रामीण भागातील बळीरामपुर येथील जय व्यंकटेश यांनी शंकर पार्वती विवाह सोहळा देखावा सजीव तयार केला यावेळी शंकरराव दासरावर ,सतिश कासेवार व परिसरातील पदाधिकारी यांनी आपल्या परिश्रमाने हा देखावा साकार केला महादेव भुमिका विजय अलसटवार, पार्वती अंजली,ब्रम्हदेव बालाजी मंगपपेली, विष्णु हरी ओम दासरवार, नंदीचा भुमिका अजय अलसटवार,यांच्यी भुमिका साकारली होती, तर जय महाराष्ट्र गणेश मंडळ मार्गदर्शक शिवराज मध्यमवार, आकाश अमृतवार, श्रीकांत कदम, गणेश सिरमेवार, राजेश कदम, शुभम पापनवार यांच्या मार्गदर्शनाखाली कलाकार, रुपेश सब्बनवार ,आकाश चव्हाण, श्यााम म्यानेवार ,साई कदम, शिवकांत कदम, शिवाजी कदम, मारोती कदम, शुभम गुंडाळे, चंद्रदीप इंगळे ,मंगेश लोकमवार, व्यंकटेश पापनवार, वैभव म्यानेवार धर्माजी शाकेवार ,संतोष अलासटवार यांनी सजीव शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित देखावा सादर केला.
दोन्ही गणेश मंडळ यांनी सिडको परिसरातील मुख्य मिरवणूक मध्ये सहभागी होत देखावा सादर करून दाखवला
यावेळी परिसरातील हडको, ज्ञानेश्वर नगर यासह सिडको अण्णा भाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज चौक, क्रांती चौक यासह विविध ठिकाणी हे देखावा व सादरीकरण करून दाखवली होती,भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने दुतर्फा उपस्थित राहून या सादरीकरणाला प्रतिसाद दिला,यावेळी सिडको परिसरातील आजी माजी लोकप्रतिनिधी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकार यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी ही दोन्ही गणेश मंडळाचे व सादरीकरण केलेल्या कलाकार याचें अभिनंदन केले, परिसरातील आलेले भाविक भक्त या देखाव्यामुळे मंत्रमुग्ध झाले होते, मिरवणुकीत ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.