नवीन नांदेडI सिडको परिसरातील कुसुमताई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक कमलाकर अंनतराव जोशी नियमित वयोमानानुसार ३१ वर्षाच्यी सेवा बजावून आज ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहे.
कमलाकर जोशी हे श्री. छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था हातराळा ता. मुखेड जिल्हा नांदेड संचलित कुसुमताई माध्यमिक व उच्च माध्यमिक विघालय सिडको येथे २० जुलै १९९२ शिक्षक म्हणून रूजू झाले, काही वर्षे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची मुख्याध्यापक पदावर संस्थेने नियुक्ती केली, संस्थेचे सचिव संभाजी बिरादार व सहसचिव शशीकलाताई बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली विघालयात शिक्षणात आमुलाग्र बदल घडवून उल्लेखनिय कार्य केले. शाळेतील ७० विधार्थी असलेली शाळा आज २००० विधार्थी संख्या आहे.
सुरूवातीला ग्रामीण भागासह शहरी भागात जाऊन नोंदणी करणे यासह रात्री अभ्यासिका, शालांत परिक्षेसाठी जादा तासिका घेणे, सांस्कृतिक कार्यक्रम अंतर्गत मराठवाड्यातील जिजाऊ महोत्साने शाळेच्यी ओळख करून दिली तर राज्य स्तरावर, विभाग, जिल्हा, तालुका या ठिकाणी विविध खेळा मध्ये अनेक पुरस्कार व शैक्षणिक उपक्रम अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध परिक्षेत शाळेच्या सहभाग नोदंवुन अनेक पारितोषिक शाळेला मिळवून दिली आहेत. सेवा काळात त्यांनी शाळेसाठी केलेल्या शिक्षणातील योगदान महत्त्वाचे आहे, सतत गेल्या दहा वर्षे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेत शाळेच्या ९५ टक्के निकाल लावुन गुणवत्तेत आणुन नावलौकिक करण्याचा प्रयत्न केला आहे.
अनेक विद्यार्थी सेवा काळात उच्च पदावर कार्यरत असून त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे,आज ३१ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत,त्या निमित्ताने आज शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने सपत्नीक सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.