नवीन नांदेडI गणेशोत्सव निमित्ताने अंनत चतुर्दशी दिवशी सिडको परिसरातील लोकप्रिय लोंढे पाटील यांचे हॉटेल छत्रपती यांच्या वतीने भाविक भक्तांसाठी मोफत एल.पी चहाचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली, या चहाचा स्वाद बंदोबस्त व असलेल्या पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी ही घेतला.
नवीन नांदेड परिसरातील युवक, नागरीक,जेष्ठ नागरिक हे लोकप्रिय असलेल्या या हॉटेलने अल्प कालावधीत एल.पी.चहाची लोकप्रियता मिळवली,सामाजिक बांधिलकी जोपसत गणेशोत्सव निमित्ताने अनंत चतुर्दशी निमित्ताने विसर्जन मिरवणूक प्रसंगी पोलीस बंदोबस्त वर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांच्या सह अधिकारी कर्मचारी, व विसर्जन मिरवणुकीतील सहभागी भाविक भक्तांना मोफत चहाचे वाटप करण्यात आले.
यावेळी संजय पाटील घोगरे, उदय भाऊ देशमुख ,माधव पाटील देवसरकर, सदा पाटील पुयड ,सतीश पाटील बस्वदे अशोक पाटील मोरे संरपच पुंडलिक पाटील मोरे, यांच्या सह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्यी उपस्थिती होती,यावेळी सामाजिक बांधिलकी जोपासत जवळपास हजारो समुदायांनी एल.पी.चहाचा मोफत स्वाद घेतला. हॉटेल मालक एकनाथ पाटील लोंढे , बालाजी लोंढे,तिरूपती लोंढे , अर्जुन बेटकर यांना वेळोवेळी मित्र परिवार यांच्ये सहकार्य मिळाले आहे.