हिमायतनगर। सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सुदर्शन देवराये यांनी आत्महत्या केली त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये शासन न्याय देईल माहित नाही परंतु त्यांची लहान लहान मुलं आणि आई-वडील हे पाहून मला काय बोलावं ते सुचत नाही भाषण करतांना उर भरून येत आहे सुदर्शन देवराये यांचे वडिलांना मुलाची त्यांच्या मुलांना वडिलांची जाणीव होऊ देऊ नका, आरक्षण तर ह्यांच्या छाताडावर बसुन घेईन परंतु तुम्ही आत्महत्या करू नका..! असं भावनिक आवाहन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी कामारी येथील जाहीर सभेत केले.
मराठा योध्दा मनोज पाटील जरांगे यांनी सुरूवातीला साखळी उपोषणस्थळी उपस्थित असलेल्या मयत सुदर्शन देवराये, यांचे वडील ज्ञानेश्वर देवराये, पत्नी ज्ञानेश्वरी देवराये, आई छायाबाई देवराये, मुलगा समर्थ, मुलगी इश्वरी यांची भेट घेऊन सांत्वन केले.
त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून वंदन केले, सुदर्शन देवराये यांच्या फोटोला फुले वाहुन श्रध्दांजली वाहिली, व्यास्पिठावरून सकल मराठा समाजातील उपस्थितांशी संवाद साधला, पुढे बोलतांना जरांगे पाटिल म्हणाले, एक मुलगा एक मुलगी आपल्या बाप्पाच्या मायेला मुकली, एक बाप मुलाच्या आधारापासून दुरावला ही वेळ यायला नको होती, परंतु देवाने या सरकारने घाला केला आपल्यातील एक भाऊ , पहिल्यांदा ४५ गेले, नंतर तीन ते चार बांधव महाराष्ट्रात पुन्हा एकदा गेले, कामारी गावात जेवढे दुःख आहे, तेवढेच दुःख महाराष्ट्रात सुद्धा आहे, लेकरांच्या व आई बापांच्या काय वेदना असतील आई-वडिलांच्या तोंडून शब्द फुटत नाहीत ते मी आत्ताच भेटुन बोलतांना अनुभवलं असा भावनिक प्रसंग सांगत होते.
बापाला-आईला एकच मुलगा होता, आईला-बापाला मुलाची, मुलाला आणि मुलीला वडीलाची जाणीव होऊ देऊ नका अस आवाहन त्यांनी उपस्थितांना केल. मी नेता नाही परंतु त्या बापाला मुलाच्या माय पासून दुराऊ नका, बापाला मुलाची उणीव भासू देऊ नका मुलं उघड्यावर पडतील असं काही होऊ देऊ नका, सरकार न्याय देईल माहित नाही परंतु तुम्ही मात्र त्यांना विसरू नका, मी एवढा पाषाण हृदयी माणूस आहे परंतु माझ्या हृदयालाही पेलावत नाही, आरक्षण तर मी सरकारच्या छाताडावर बसून घेईल परंतु तुम्ही आत्महत्या करू नका असं ही भावनिक आवाहन मनोज जरागे पाटील यांनी केलं.
यावेळी त्यांचे सोबत दत्ता पाटिल हडसणीकर यांचेसह सकल मराठा समाजातील विविध पक्षाचे पुढारी, पदाधिकारी, सकल मराठा बांधव व तरूण मोठ्या संख्येने हजर होते.