हिमायतनगर, अनिल मादसवार| गावकऱ्यांच्या सहकार्यामुळेच जवळगाव स्वच्छ आणि सुंदर होऊ शकले, असे मत आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी व्यक्त केले. स्वच्छता ही सेवा या अभियानातंर्गत हिमायतनगर तालुक्यातील जळगाव येथे आज रविवार दिनांक 1 ऑक्टोंबर रोजी एक तारीख एक तास श्रमदान उपक्रम आमदार जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक मधून म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त सुरेश बेथमुथा, जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, नरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, कार्यकारी अभियंता रायभोगे, गट विकास अधिकारी कैलास बळवंत, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे, स्वच्छता तज्ञ विशाल कदम, प्रल्हाद पाटील टेंभूर्नीकर, सरपंच प्रतिनिधी नितेश पवार, उपसरपंच सुभाष माने, आदींची यावेळी मंचारवर उपस्थिती होती.

पुढे ते म्हणाले, स्वच्छ गाव करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. लोकसभागातून केलेल्या कामामुळे जवळगावला माझी वसुंधरा अभियानाचा राज्यातला व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार, आर.आर. आबा पाटील स्मार्ट ग्राम जिल्ह्यात प्रथम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा विभागातला पहिला पुरस्कार मिळाला आहे. तसेच ग्रामपंचायत आयएसओ नामांकन करण्यात आली आहे. याचे सर्व श्रेय माझ्या गावकऱ्यांना जाते, असे त्यांनी यावेळी सांगितले. यापुढेही आमचे गाव कायम स्वच्छतेत शाश्वत ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचेही आमदार माधवराव पाटील जवळगावकर म्हणाले.
गावाने देशात ओळख निर्माण करावी- उपायुक्त बेथमुथा

जवळगाव ग्रामपंचायतीने महाराष्ट्रातच नव्हे तर देशात वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी नावीन्यपूर्ण काम करावे, असे मत छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त सुरेश बेथमुथा यांनी व्यक्त केले. गावात वृक्ष लागवड, रस्ते शौचालय, पाणी आदी भौतिक सुविधा दिल्या झाल्या. परंतु हे टिकून ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम येण्यासाठी गुणांकाप्रमाणे गावात काम करणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष गुणांकन कसे आहे. निकष काय आहेत याची ग्रामस्थांना माहिती दिली. शिक्षकांनी शाळेची रंगरंगोटी करून शाळा बोलकी करावी. गावकऱ्यांनी दररोज किमान 20 मिनिटे स्वच्छतेसाठी द्यावीत असेही ते म्हणाले. गावात हे काम करत असताना गावाचे एक तरी वेगळे वैशिष्ट्य निर्माण करून गावाची ओळख देशपातळीवर करावी, असे आवाहनही उपायुक्त सुरेश बेथमुथा यांनी केले.
प्रारंभी राष्ट्र संत तुकडोजी महाराज व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अपर्ण करुन दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल, बुके व श्री गणेश मुर्ती देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद व्यवहारे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बी.एन. मदस्वार यांनी तर उपस्थितांचे आभार व्ही.ए. गोवंदे यांनी मानले. यावेळी आमदार माधवराप पाटील जवळगावकर, उपायुक्त सुरशे बथमुथा यांच्यासह हाजारो हात श्रमदानात लागले आणि काही वेळात गाव स्वच्छ झाले. या कार्यक्रमाला विस्तार अधिकारी शिंदे, प्रमोद लाला, केशवजी बासरकर, रामदास पवार, सतीश क-हाडे, दत्तात्रेय पांचाळ, सय्यद चांद साब, गणेश काचारे, बाबुराव पाटील, गोविंदराव शर्मा, श्रीरंग पवार, प्रदीप पटने, उत्तमराव पाटील, सय्यद सरवल साब, दिगंबर पाटील, नागोराव पवार, रावसाहेब पवार, शंकर धरमुरे, ग्रामविकास अधिकारी शैलेश वडजकर, ग्रामसेवक कदम यांच्यासह गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, शालेय विद्यार्थी, शिक्षक, आशा वर्कर, अंगणवाडी ताई, मदतनीस, युवक-युवती, महिला व ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.