नवीन नांदेडl डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झालेल्या रूग्णांचा ऊपचारा दरम्यान १ ते २ आक्टोबर रोजी २४ तासात २४ रुग्णांच्या मुत्यु, झाला असुन यात १२ लहान बालके व ३ हद्रय विकाराने ईतर ९ अशा २४ जणांचा समावेश असून शासकीय रुग्णालयात या झालेल्या मृत्यूंची नोंद झाल्यानंतर ही घटना सोशल मीडियावर प्रसारित होताच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी २ आक्टोबर रोजी विष्णुपरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय नांदेड येथे भेट देऊन वैद्यकीय अधिकारी यांची बैठक घेऊन विविध विभागातील कमतरता असलेल्या वैद्यकीय अधिकारी, डॉकट्टर यांच्या सह रूग्णालयात कमतरता असलेल्या औषधीसाठा व ईतर अत्यावश्यक सेवेवर चर्चा करण्यात आली.
यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक राव चव्हाण यांनी तात्काळ विना विलंब कार्यावाही करणे गरजेचे असल्याचे सांगितले
१ आक्टोबर रोजी विष्णुपरी येथील विष्णुपरी येथील शासकीय रुग्णालयात २४ रूग्णाच्या २४ तासात मुत्यु झाल्याची घटना घडल्याची सोशीयल मिडिया वर घटना प्रसरीत होताच खळबळ उडाली हि घटना कळताच राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण तात्काळ विषणुपरी येथील शासकीय रुग्णालयात भेट देऊन पाहणी व माहिती घेतली.
तातडीने रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांच्यी बैठक २ आक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता बैठक आयोजित केली,या वेळी संबंधित घटनेचा आढावा घेतला,या वेळी वैद्यकीय अधिकारी शामराव वाकोडे, डॉ.निळकंठ भोसीकर, डॉ.भुरके,डॉ.तांबे,डॉ.कपिल मोरे यांच्या सह संतोष पांडागळे,सामाजीक कार्यकर्ते नरसिंग हंबर्डे, शिवप्रसाद कुबंडे यांच्या सह विविध विभागाचे प्रमुख उपस्थितीत होते, यावेळी विविध विभागातील वैद्यकीय अधिकारी व विभाग प्रमुख यांची असलेली कमतरता, औषधांच्या तुटवडा ,सिटी स्कन बंद अवस्थेत,परिचारीका कमतरता यासह विविध विषयावर चर्चा केली यावेळी शासकीय रुग्णालयात तज्ञ डॉक्टर गरज असेल तर खाजगी डॉक्टर यांची मदत घ्या,व घटनेची चौकशी होणे गरजेचे असल्याचे सांगून.
या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सांगितले तर जिल्हाधिकारी अभिजित राऊत,पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे हे ही विष्णुपूरी येथे दाखल होऊन वैद्यकीय अधिकारी यांच्या सोबत चर्चा केली आहे.या घटनेमुळे सोशियल मिडिया वर प्रसारित झालेली घटना पाहुन खळबळ उडाली. ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप हे शासकीय रुग्णालयात पोलीस अंमलदार सह दाखल झाले आहेत.