Home किनवट विशेष पथक नेमून ग्रामिण नागरीकांच्या कार्यालयीन कामकाज करण्यास प्राधान्य देऊ – डॉ मृणाल जाधव -NNL

विशेष पथक नेमून ग्रामिण नागरीकांच्या कार्यालयीन कामकाज करण्यास प्राधान्य देऊ – डॉ मृणाल जाधव -NNL

by NNL ऑनलाईन

किनवट| किनवट तालुक्यातील ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष देऊन ते मार्गी लावण्यासाठी प्रथम प्राधान्य देऊत त्यात विशेष करुन श्मशान भुमी, पांदण रस्ते व निराधाराच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष देत कार्यालयातील प्रलंबित कामे मार्गीलावु गौन खनिज तस्करीला आळा घालण्यासाठी विशेष पथक नेमु व ग्रामिण भागातुन आलेल्या प्रत्येक नागरीकांच्या कार्यालयीन कामकाज करण्यास प्राधान्य देऊ अशी माहिती तहसिलदार डॉ मृणाल जाधव यांनी दिली.

आज दिनांक १२ रोजी मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने किनवट येथे नव्याने रुजु झालेल्या पहिल्या महिला तहसिलदार डॉ मृणाल जाधव यांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे किनवट तहसिल कार्यालयाची स्थापना झाल्या पासुन पहिल्या महिला तहसिलदार म्हणुन त्यांना इथे काम करण्याची संधी प्राप्त झाली हे विशेष यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या कि किनवट या भागातील प्रलंबित कामे आता राहणार नाही याची खबरदारी घेऊ, कार्यालयाता येणा-या प्रत्येकाची कामी जलदगतीने व्हावी यास प्राधान्य देऊ व गौन खणिज उत्खननाच्या संदर्भात मा. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची निर्मिती करण्यात आली.

गौण खनिज तस्करीवर आळा घाळु यासह तालुक्यातील विविध ज्वलंत प्रश्नावर त्यांनी पत्रकाराशी चर्चा केली यावेळी पत्रकार संघाचे मुख्य सल्लागार के. मुर्ती, प्रदिप वाकोडीकर, गंगाराम गड्डमवार, किशन भोयर, फुलाजी गरड पाटील, पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सुधाकर कदम, सचिव प्रकाश कार्लेवाड, प्रसिध्दी प्रमुख कचरु जोशी, कार्यकारणी सदस्य, किरण ठाकरे, प्रमोद पोहरकर, आडेलु बोनगीर, बालाजी शिरसाठ आदिंची प्रमुख उपस्थिती यावेळी जिल्हा निर्मितीचे व मांडवी इस्लापुर तालुका निर्मितीचे निवेदने देऊन या विषयी चर्चा करण्यात आली ज्यास तहसिलदार डॉ मृणाल जाधव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

 

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!