Home राजकीय अन्य ठिकाणी गेलेले जेष्ठ शिवसैनिकांची आ बांगर यांच्या उपस्थितीत घरवापसी -NNL

अन्य ठिकाणी गेलेले जेष्ठ शिवसैनिकांची आ बांगर यांच्या उपस्थितीत घरवापसी -NNL

हिंगोली| आ. संतोष बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत माजी सर्कल प्रमुख जानकीराम जगताप, ज्येष्ठ कार्यकर्ते कानबाराव शिंदे, आणि माजी प.स.सदस्य अशोकराव करे यांची शिवसेनेत घरवापसी झाली आहे.

हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर हे ज्या पद्धतीने २४ तास जनतेची सेवा करत आहेत. शेतकरी, गोरगरीब जनता, कोरोना रुग्ण विद्यार्थ्यांच्या अडचणी, कर्मचार्‍यांच्या अडी-अडचणी, महिलांच्या समस्या इत्यादी समाजातील सर्व घटकांच्या अडचणीत धावून जातात. त्यांच्या समस्येचे जागेवरच निराकरण करणारा.. असा नेता हिंगोली जिल्ह्यात आधी झाला नाही….यानंतर ही होणार नाही.. आमदार संतोष बांगर यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन तसेच हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेची पाळेमुळे घट्ट रुजवुन शिवसेना रुपी वटवृक्ष वेगाने वाढविण्याचे काम ज्या पद्धतीने आमदार बांगर करीत आहेत.

त्यामुळे एका माजी आमदारा सोबत शिवसेना सोडून भाजपात गेलेले. नांदापूरचे माजी सर्कल प्रमुख श्री जानकीराम जगताप, पुयना येथील ज्येष्ठ कार्यकर्ते कानबारावजी शिंदे तसेच वारंगा मसाई येथील माजी प.स. सदस्य अशोकराव करे यांनी आज आमदार बांगर साहेबांच्या कार्य शैलीने प्रभावित होऊन त्याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत घरवापसी केली. यावेळी नगरसेवक राजू संगेकर, अतुल बुर्से, शिवराज पाटील हे उपस्थित होते.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!