Home निधन वार्ता माजी सभापती केशवराव पाटील बाबर आष्टुरकर यांचे निधन -NNL

माजी सभापती केशवराव पाटील बाबर आष्टुरकर यांचे निधन -NNL

लोहा| तालुक्याच्या राजकीय -सामाजिक क्षेत्रात पहेलवान म्हणून परिचित असलेले व प स चे माजी सभापती केशव पाटील बाबर यांचे आज सोमवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले मृत्यू समयी त्याचे वय ८५वर्ष होते.सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर आष्टुर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रांगडा स्वभाव, धिप्पाड शरीरयष्टी कधी जहाल तर कधी मवाळ असे व्यक्तिमत्त्व असलेले बाबर हे केशव पहेलवान या नावाने परिचित होते. माजी सभापती बाबर यांचे ऐंशी-नव्वद च्या दशकात माळाकोळी-आष्टुर-या भागात पकड होती. देशाचे माजी गृहमंत्री डॉ शंकरराव चव्हाण यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. तसेच माजी मंत्री विनायक पाटील अहमदपूर, माजी आ.ईश्वरराव भोसीकर, माजी सभापती व्यंकटराव मुकदम, माजी सभापती विठ्ठलराव पवार, माजी नगराध्यक्ष कल्याणराव सुर्यवंशी यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबध होते.

पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या काँग्रेस पक्षाच्या सक्रिय होते.त्यानंतर ते अखेर पर्यन्त जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सोबत राहिले. त्यांनीच केशव पहेलवान याना प स चे सभापती केले (२००९-२०१२) केशव पाटील यांनीं लोहा कृउबा समितीचे संचालक, बालाघाट सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

गावाच्या ग्रामपंचायत मध्ये ते दीर्घकाळ सतेत होते. माळाकोळी परिसरामध्ये नागरिक समस्या, प्रश्न घेऊ, घरगुती वाद गावातील तंटे मिटवण्याचे काम ठिकाण केशवराव पाटील बाबर यांनी केले ते लोकांच्या मदतीला नेहमीच धावून जात त्यांनी ज्यांना आशीर्वाद दिला तोच या भागाचा जि प सदस्य व्हायचे असा प्रभाव होता. दिवाळीच्या दिवशी स्वतः खा चिखलीकर, प्रवीण पाटील, सचिन पाटील असा चिखलीकर परिवार त्याच्या भेटीला गेला होता त्यांच्या निधना बद्दल अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार असून, शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर आष्टुर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!