Home नांदेड दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पोलीस अधीक्षकांशी साधला संवाद -NNL

दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पोलीस अधीक्षकांशी साधला संवाद -NNL

समाजाला शांततेचे आवाहन

नांदेड| शहरात आज काढण्यात आलेल्या मुक मोर्चातील आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडले असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे . शिवाय दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचे काम करत दगडफेक करणाऱ्या दंगलखोरांवर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे. या अनुषंगाने त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला तर याच वेळी समाजाने शांतता बाळगावी, असे आवाहनही त्यांनी केले.

नांदेड शहरात आज मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांनी शिवाजीनगर ,वजीराबाद आणि देगलूर नाका परिसरात दगडफेक केली . या दगडफेकीत अनेकांच्या दुकानांची नासधूस झाली तर वाहनांच्याही काचा फुटल्या. आर्थिक नुकसान करणाऱ्या या दगडफेकीत व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांचे मानसिकही खच्चीकरण झाले आहे . अशा परिस्थितीत दगडफेक करणार्‍यांच्या ताबडतोब मुसक्या आवळण्यात या यात. त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे. घटनेची माहिती मिळताच परिस्थितीची पाहणी करण्यासाठी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, विजय गंभीरे, मारोती वाघ, शितल खांडिल, विपुल मोळके, सोनु उपाध्याय, अमोल कुल्थीया दिलीपसिंघ सोडी तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे पदाधिकाऱ्यांसह अन्य पदाधिकार्‍यांनी भेट देऊन पाहणी केली.

दरम्यान, शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी पोलिस प्रशासनाने दंगलखोरांना वेळीच आवर घालावा अशी मागणी करतानाच अन्य समाजांनी शांतता बाळगावी, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, सामाजिक एकता आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य कोणीही करू नये ,असे आवाहनही खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे. शिवाजीनगर आणि अन्य भागात झालेल्या दगडफेकीची माहिती मिळताच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती जाणून घेण्यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. पोलिसांचे कोणतेही मानसिक खच्चीकरण होऊ देऊ नका आम्ही पोलिसांच्या पाठीशी आहोत असे मानसिक बळही खासदार चिखलीकर यांनी दिली आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!