Home हालचाली खडकी गावात देशीदारुचा महापूर; पोलीस प्रशासन व स्थागुशाचे दुर्लक्ष -NNL

खडकी गावात देशीदारुचा महापूर; पोलीस प्रशासन व स्थागुशाचे दुर्लक्ष -NNL

हिमायतनगर| तालुक्यातील मौजे खडकी बा.येथे सणासुदीच्या काळापासून दारूची सर्रास विक्री व इतर गावांना पुरवठा केला जात आहे. असे असताना याकडे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे दारूची अवैद्य विक्री जोमात सुरु आहे.

गेल्या अनेक वर्षापासून खडकी बा.येथे दारूची अवैद्य रित्या विक्री केली जात होती. मात्र पोलिस प्रशासनाच्या वतीने केवळ जुजबी कार्यवाही केली जात होती. परिणामी कार्यवाहीनंतर आमचा काहीच वाकडे झाले नाही या अविर्भावात येथील दारू विक्रेत्यांनी काही राजकीय पुढार्यांना हाताशी धरून देशीचा गोरखधंदा पुन्हा सुरु केला होता. त्यामुळे परवानाधारक दारूची दुकान नागरिकांच्या एकजुटीने खडकी गावात बंद झाली. त्यानंतर पुन्हा या गावात विनापरवाना खुले आम दारूची विक्री आणि सप्लाय केला जात आहे.

तसेच दारूचा साठा शेतातील एका ठिकाणावर उतरविला जात असून, गोर गरिबांना अव्वाच्या सव्वा दराने दारूची विक्री करून अनधिकृत रित्या दारू विकणाऱ्याने लूट चालविली आहे. या गोरखधंद्यात खडकी गावातील दारू विक्रेता मालामाल होत असून, गरीब, मजूरदार शेतकरी दारूच्या आहारी जात असल्याने गावात पुन्हा तंटे निर्माण होत आहेत. हिमायतनगर तालुक्यात असलेल्या मौजे खडकी बा. येथे स्थागुशाच्या पथकाने लक्ष देऊन दारूची साठेबाजी करत परिसरात पुरवठा करणाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी गावातील सुजाण नागरीकातून केली जात आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!