Home अर्धापुर अर्धापूर पोलीसांचा मोर्चा आता अवैध धंदेवाल्यांच्या विरोधात -NNL

अर्धापूर पोलीसांचा मोर्चा आता अवैध धंदेवाल्यांच्या विरोधात -NNL

घाविरूध्द गुन्हा दाखल,दारू विक्री करणारांना मिळणार चोप

अर्धापूर, निळकंठ मदने| तालुक्यातील देळूब (बू) येथील सोशल मिडियावर आक्षेपार्ह मजकूर लिहिणार्या चार जणांना चोप देऊन कडक कारवाई केल्यानंतर आता तालुक्यात अवैध धंदे करणाराविरूध्द अर्धापूर पोलीसांनी मोर्चा उघडला. शहरात पोलीसांना गुंगारा देत मटका घेणारा दोन जणाविरूध्द कारवाई करण्यात आली आहे. तर अर्धापूर, पार्डी, लहान, मालेगाव येथे अवैध दारूविक्री करणाविरूध्द पोलीसांनी मोर्चा उघडला आहे.

अर्धापूर शहरात पोलीसांना गुंगारा देत मोठ्या प्रमाणावर गुटका विक्री सुरू आहे. नई आबादी,बसस्थानक परिसरात मटका घेतला जातो,मालेगाव येथे मटका व जुगार चालतो,लहान येथे मटका व अवैध दारू विक्री होत असते,पार्डी (म) येथे सुशिक्षीत बेरोजगार मुले अवैध दारू विक्री करतात. कामठा येथे मटका व जुगार मोठ्या प्रमाणावर चालत होता. अर्धापूर तालुक्यातील अनेक धाब्यावर अवैध दारू खुलेआम चालते,धाबेवाले खुलेआम दारूविक्री करतात. दारूबंदी अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करतात,आता दस्तुरखुद्द अर्धापूर पोलीसांनी अर्धापूर शहरात कल्याण, मिलन नावाचा मटका घेत असतांना प्रकाश कांबळे, अमेश जोंधळे या दोन जणांना पकडून सपोउपनी प्रकाश पवार यांच्या फिर्यादीवरून कडक कारवाई केली,.

आता गावागावात अवैध दारू करणारांना अर्धापूर पोलीस पोलिस ठाण्यात आणून चोप देऊन कडक कारवाई करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी दिली. त्यामुळे कुणालाच न जुमाननाऱ्या अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहे. देळूब येथील चार युवकांना सोशल मिडियावरून आक्षेपार्ह मजकूर लिहिणारांना गाववाल्यांच्या समोर चोप दिऊन कारवाई केल्याने गैरकृत्य करणारांवर पोलीसांचे वर्चस्व दिसत आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!