Home निधन वार्ता बापूजी पाटील वडवळे कापसीकर यांचे निधन -NNL

बापूजी पाटील वडवळे कापसीकर यांचे निधन -NNL

लोहा। लोहा तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते कंधार पंचायत समितीचे माजी सदस्य बापूजी रावसाहेब पाटील वडवळे यांचे आज वृद्धोकाळात अल्पसा आजाराने निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय ८०वर्ष होते.

तालुक्यातील कापसी बु. या गावचे तीन दशकाहून अधिक काळ बापूजी पाटील यांनी सरपंच पद सांभाळले.सर्वाना सोबत घेऊन चालणारे निःस्वार्थ नेतृत्व होते .त्यांचे आज निधन झाले त्यांच्यावर कापशी बु येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.यांच्या पश्चात चार मुलं व एक मुलगी नातू नातवंडे असा मोठा परिवार आहे.लोह्याचे माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम यांचे सासरे तरब नगरसेविका कल्पनाताई चव्हाण मुकदम यांचे वडील व युवा नेते सचिन मुकदम यांचे ते आजोबा होते.

जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर, आ .श्यामसुंदर शिंदे, माजी आ रोहिदास चव्हाण, उद्योजक मारोतराव कवळे, माणिकराव मुकदम, प्रवीण पाटील चिखलीकर, अनिल मोरे यासह अनेक मान्यवर व परिसरातील नातेवाईक कार्यकर्ते यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!