Home निधन वार्ता अमृतराव आडगावकर गुरुजी यांचे निधन -NNL

अमृतराव आडगावकर गुरुजी यांचे निधन -NNL

लोहा| सेवानिवृत्त शिक्षक आणि वाचन संस्कृती रुजविण्यासाठी आयुष्यभर कार्य करणारे अमृतराव तुळशीराव क्षीरसागर आडगावकर यांचे कर्क रोगाच्या आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७२ वर्ष होते.

माजी आ रोहिदास चव्हाण व नाट्य लेखक शेषराव काहलेकर यांच्यात सोबत नाटकात त्यांनी काम केले. संत गाडगे महाराज विद्यालयात त्यांनी शिक्षक म्हणून सेवा केली.गेल्या २२-२४ वर्षा पासून त्यांनी जुन्या लोह्यात कै देवराव मुकदम या नावाने त्यांनी वाचनालय सुरू केले.वाचन संस्कृती रुजविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले.

त्याच्या पश्चात आई, पत्नी, तीन भाऊ,बहीण, पुतणे, नातवंडे, असा परिवार असून थोरली मुलगी बालिका अन्नकाडे (शिक्षिका) जावई अन्नकाडे ( विक्री कर अधिकारी) धाकटी मुलगी प्रियंका गवते ( तलाठी), जावई विनोद गवते हे शिक्षक असून, असा मोठा परिवार आहे . जुन्या शहरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!