Home क्राईम हिमायतनगर पंसच्या कनिष्ठ सहायकास लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले – NNL

हिमायतनगर पंसच्या कनिष्ठ सहायकास लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले – NNL

हिमायतनगर, अनिल मादसवार| सेवानिवृत्ती नंतरचे अर्जित रजा रोखीकरणाचे देयक बिल तयार करून वरीष्ठ कार्यालयाकडुन बजेटची मागणी करण्यासाठी 5,000 रुपायची लाचेची मागणी करून मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या हिमायतनगर पंचायत समितीच्या आरोपी लोकसेवक कनिष्ठ सहायक प्रकाश वाघमारे याना लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. या कार्यवाहीने लाचखोर अधिकारी – कर्मचाऱ्याच्या एकच खळबळ उडाली आहे.

हिमायतनगर येथील पंचायत समिती कार्यालयात आरोपी लोकसेवक कनिष्ठ सहायक प्रकाश वाघमारे हे नोकरी करतात. त्यांच्या मार्फत या कार्यालयात कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती नंतरचे अर्जित रजा रोखीकरणाचे बिल तयार करून वरीष्ठ कार्यालयाकडुन बजेटची मागणी केली जाते. अशीच एका कर्मचाऱ्याने सेवानिवृत्ती नांतर आपल्या सेवानिवृत्तीनंतरची बिल काढणीसाठी प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यासाठी लोकसेवक प्रकाश शंकराव वाघमारे वय 50 वर्ष व्यवसाय नोकरी कनिष्ठ सहायक, पंचायत समिती हिमायतनगर यांनी तक्रारदाराकडे याकामासाठी 5,000/- रु. लाचेची रक्कम मागितली होती.

सादर प्रकरणासाठी लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने दि. 26/11/2021 रोजी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाच मागणी पडताळणी दिनांक. 29/11/2021 रोजी केली असता लोकसेवक प्रकाश शंकराव वाघमारे यांनी लाच मागणी करून मिळविण्याचा प्रयत्न केला. यावेळी येथे उपस्थित असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रकाश वाघमारे यांना तक्रारदाराकडून लाच घेताना रंगे हात पकडले. हि कार्यवाही डॉ राहुल खाडे, पोलीस अधिक्षक, ला. प्र. वि. औरंगाबाद परिक्षेत्र,अतिरिक्त कार्यभार नांदेड यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस उपअधीक्षक, ला. प्र. वि. नांदेडचे धरमसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वखाली सापळा अधिकारी शेषराव नितनवरे, ला.प्र.वि. नांदेड, सहा.सापळा अधिकारी दत्ता केंद्रे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नांदेड, सापळा पथक पोहेकॉ किशन चिंतोरे, पोना हणमंत बोरकर, ईश्वर जाधव, गजानन राऊत यांनी कार्यवाही केली आहे.

यावेळी लाचलुचपत अधिकाऱ्यांनी जनतेला आवाहन केले कि, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ अँन्टी करप्शन ब्युरो, पोलीस वसाहत स्नेहनगर नांदेड, दुरध्वनी – 02462-253512 , धरमसिंग चव्हाण , पोलिस उप अधीक्षक, ला. प्र. वि. नांदेड, मोबाईल नंबर – 9923417076 @ टोल फ्रि क्रं. 1064 क्रमांकावर संपर्क साधून भ्रष्टाचार बाबत तक्रार करून दाद मागता येणार आहे. असे आवाहन त्यांनी नांदेड न्यूज लाईव्हच्या माध्यमातून केले आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!