Home क्राईम प्रेयसीच्या बापानेच सहकाऱ्यांच्या मदतीने प्रियकराचा केला खून – NNL

प्रेयसीच्या बापानेच सहकाऱ्यांच्या मदतीने प्रियकराचा केला खून – NNL

पुरावा नष्ठ करण्यासाठी खोल खड्ड्यात मृतदेह खोल खड्डा करुन पुरला

मुखेड, रणजित जमखेडकर| हासनाळ (प.मु.) येथिल युवक व युवतीमध्ये प्रेमसबंध जुळलेल्या प्रियकराचा प्रेयसीच्या बापानेच सहकाऱ्यांच्या मदतीने ३१ औक्टोबर रोजी शेतात नेऊन दोरीने हातपाय बांधून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतृदेहाची विल्हेवाट लावली असल्याची घटना मुखेड तालुक्यातील रावणगाव शिवारात घडली आहे. तब्बल एक महीण्यानंतर सदरील खुन प्रकरणाचा छडा लावण्यास मुक्रमाबाद पोलीसांना यश आले आहे.

लेंडी धरणग्रस्त मौजे हसनाळ ता. मुखेड येथील सुर्यकांत नागनाथ जाधव (२२ ) या युवकाचे चार महिन्यापूर्वी गावातच असलेल्या नातलगातील मुलीशी प्रेमसबंघ जुळले होते. सदरील प्रेमसबंधाची कुणकुण मुलीच्या वडीलाला लागल्याचे प्रियकर सुर्यकांत जाधव याला समजताच तो गाव सोडला होता. चार महिण्यानंतर पुन्हा तो ३१ औक्टोबर रोजी गावाकडे येत होता. सुर्यकांत गावाकडे येत आसल्याची माहीती मुलीचे वडील माधव सोपान थोटवे यास मिळताच सुर्यकांतचा कायमचा काटा काढायचाच या हेतुने आपल्या मेहूण्यासह गावाकडे येणाऱ्या रस्त्यातच सुर्यकांत जाधव याला गाठून रावणगाव शिवारातील शेतात त्याचा खून केला.

या घटनेची बाहेर वाच्चता होऊ नये म्हणून मृतदेह खोल खड्डा करुन पुरुन पुरावा नष्ट केला. सुर्यकांत जाधव घराकडे आला नाही व त्याचा फोनही लागत नसल्याने भाऊ रवीकांत जाधव यांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर तो सापडत नसल्याने अखेर मुक्रमाबाद पोलीसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मुक्रमाबाद ठाण्याचे सपोनि संग्राम जाधव, पोलिस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे व गजानन कांगणे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून दोन आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

आरोपी माधव सोपान थोटवे रा. हसनाळ (प.मु. ) व त्याचा मेव्हणा पंढरी मरीबा गवलवाड रा.कोळनूर ता. मुखेड या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यावरून त्यांच्या विरुद्ध मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना मुखेड कोर्टासमोर हजर केले असता आरोपींना १ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. आज रविवार दि. २८ नोव्हेंबर रोजी तपास अंतर्गत आरोपीला घटनास्थळी नेऊन रावणगाव शिवारात जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणी करण्यात आली. यावेळी सपोनि संग्राम जाधव, देगलूर ठाण्याचे सपोनि कमलाकर गड्डीमे, तलाठी कदम आदीसह अनेकांनी परिश्रम घेतले. तपास कामी बाऱ्हाळी पोलीस चौकीचे जमादार योगेश महिंद्रकर, हांडे, बब्रूवान लुंगारे, माधव पवार हे तपासात मदत करत आहेत. पुढील तपास सपोनि संग्राम जाधव हे करीत आहेत.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!