Home अर्धापुर नायगांव.माहुर.आर्धापुर नगरपचायंत निवडणूकीत खा.चिखलीकर केव्हा येणार कार्यकर्ते मध्ये उत्साह -NNL

नायगांव.माहुर.आर्धापुर नगरपचायंत निवडणूकीत खा.चिखलीकर केव्हा येणार कार्यकर्ते मध्ये उत्साह -NNL

नांदेड। जिल्ह्यातील प्रमुख तिन ठिकाणच्या नगरपचायंत निवडणूका जाहिर झालेल्या आहेत.नायगांव.माहुर,आर्धापुर या ठिकाणी 21 डिसेंबर ला मतदान होणार आहे.या निवडणूकीत भाजपाने जरी स्थानिक किवा कुणावरही जवाबदारी दिली आसेल तरिही खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे केव्हा या सर्व ठिकाणी येणार आहेत आशी चर्चा आता निष्ठावंत भाजपा कार्यकर्ते करत आहेत.

नायगांव या नगरपचायंत ची हि दुसरी निवडणूक आहे तर या ठिकाणचे माजी आमदार विद्यमान ना.जि.म.बँक अध्यक्ष वसंतराव पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा बाल्लेकिल्ला समजला जातो.चव्हाण परिवारातील सर्वच नायगांव निवडणूकीत एकत्र येऊन विरोधकाना कुठल्याही प्रकारची संधी देत नाहीत.मागील 2015 निवडणूकीत खासदार प्रतापराव पा.चिखलीकर यानी या ठिकाणी जोरदार फिल्डीग लावली होती पण निवडणूक पहिली आसल्यामुंळे थोडक्यात काही जागा गेल्या आणी काँग्रेस एकहाती सत्ता संपादन करु शकले.

माहुर हे रेणुका माता तथा दत्त संस्थान आसल्याने संपूर्ण भारतातुन पर्यटक या ठिकाणी दर्शनासाठी येत आसतात.पण या ठिकाणचा म्हणावा तितका विकास झाला नाही यावेळी या भागाचे आमदार भिमराव केराम हे आहेत तर या ठिकाणी निवडणूक प्रमुख म्हणून आमदार तुषार राठोड याची नियुक्ती करण्यात आली आहे.हा मतदारसंघ हिगोली लोकसभा क्षेत्रात येत आसला तरिहि या ठिकाणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केव्हा येणार आसल्याची चर्चा नागरिकात आहे.

आर्धापुर नगरपचायंत हे भोकर विधानसभा क्षेत्रात येते व या भागाचे आमदार तथा पालकमंत्री ना.आशोक चव्हाण हे आहेत आणी 2019 च्या लोकसभा निवडणूकीत ना.आशोक चव्हान विरूद्ध खा.प्रतापराव पाटील चिखलीकर आशी निवडणूक झाली व यात खासदार चिखलीकर यानी ना,आशोक चव्हाण याचा 50 हाजार मतानी पराभव केला, हा पराभव म्हणजे नांदेड जिल्ह्याचे इतिहासात नोंद व्हावी आसाच झाला.म्हणून आर्धापुर मध्ये खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे काहि यंत्रणा राबवणार कश्या पद्धतीने काँग्रेस व ना.आशोक चव्हाण याना रोकणार आणी कार्यकर्ते हे खासदार चिखलीकर यांच्यावर प्रचंड विश्वासार्हता ठेवतात हिच बाब येणाऱ्या निवडणूकीत भाजपासाठी आतिशय महत्त्वाची ठरणार आहे.

नांदेड जिल्ह्यात भाजपाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आमदार डाँ.तुषार राठोड.आमदार राजेश पवार.आमदार राम पाटील रातोळीकर.आमदार भिमराव केराम व आनेक दिग्गज मंडळी आहे.सर्वजन गट-तट बाजुला ठेवून सर्वासोबत समन्वय साधुन हि निवडणूक लढवली तर निश्चितपणे भाजपा व सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्ते याचा विजय होईल आन्यथा “जैसे थे” म्हणून पुन्हा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु होतील.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!