Home क्राईम कत्तलखाण्याकडे जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून हदगाव पोलिसांच्या ताब्यात -NNL

कत्तलखाण्याकडे जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून हदगाव पोलिसांच्या ताब्यात -NNL

हदगाव| कत्तलखाण्याकडे जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून येथील पशु प्रेमी युवकांनी त्यांतील कोबलेल्या जनावरासह वाहन पोलिसांच्या ताब्यात दिले. जेव्हा वाहनाचा पाठलाग करित असताना वाहनचालकाने रोडवरील वाहन शेताच्या धुर्‍यावरुन भरधाव वेगाने चालवत नेले.

पुढे रस्ता दिसत नसल्याने वाहन उमरखेड रोड वरिल केरबा सावकार यांच्या शेतात थांबवले व तेथून पळ काढण्याच्या प्रयत्न केला. तो पर्यंत घटनास्थळी हदगावचे पोलीस प्रशासन व पशुवैधकीय डॉक्टरांना सदरील घटनेची माहिती देऊन घटनास्थळी पोलीस उप निरीक्षक एस.टी.मोरे व पोलीस उप निरीक्षक मोरे यांनी वाहनाचा आतील गाई व वासरांना युवकाच्या यांच्या हस्ते वाहनाच्या बाहेर काढून पाहीले.

यावेळी अनेक जनावरे भरधाव वेगाने वाहन चालवत आल्याने शेतातील असलेल्या खड्ड्यांमुळे जनावरांना मुक्का मार लागल्याने बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसून येत होते. त्यांना डॉ राजीव तरपेवाड आणि त्यांचे सहकारी डॉ/ हुकुम यांनी सर्व बेशुद्धावस्थेत असलेल्या गाईला सलाईन लावून तिथेच औषध उपचार करून शुद्धीवर आणले. या घटनेचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक एस.टी.मोरे व पोलीस उप निरीक्षक मोरे करीत आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!