Home माहुर माहूर व हिमायतनगर येथे पक्के अनुज्ञप्ती शिबिर -NNL

माहूर व हिमायतनगर येथे पक्के अनुज्ञप्ती शिबिर -NNL

अर्जदारांनी लसीकरण प्रमाणपत्रासह शिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन

नांदेड| हिमायतनगर येथे 21 डिसेंबर व माहूर येथे 23 डिसेंबर 2021 या दिवशी पक्के अनुज्ञप्ती चाचणी संबंधी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयात 11 व 18 डिसेंबर रोजी कार्यालयीन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या दिवशी स्थानिक सुटी जाहीर झाल्यास अथवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास शिबिराच्या तारखेत बदल होवू शकतो.

अर्जदारांनी उपलब्ध अपॉईटमेंट घेऊन कोरोना लस घेतल्याचे प्रमाणपत्रासह या शिबिरास उपस्थित राहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!