Home नायगांव पत्रकार व कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन -NNL

पत्रकार व कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन -NNL

नायगाव, दिगंबर मुदखेडे। तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव व त्यांच्या कुटुंबियांसाठी मराठी पत्रकार परिषद सलग्न.. नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने, डॉ.विश्वास चव्हाण व डॉ.शिवाजी कागडे यांच्या सेवा सहकार्याने सदर आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन 3 डिसेंबर रोजी दुपारी 2 ते 6 या वेळेत चव्हाण हॉस्पिटल नायगाव येथे करण्यात आले आहे.

सदर शिबिर मराठी पत्रकार परिषदेच्या 82 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आले आले आहे. या शिबिराचे उद्घाटन माजी आ. वसंतराव पाटील चव्हाण, यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण व बांधकाम सभापती शिवराज पाटील होटाळकर,भाजपा नेते श्रावण पाटील भिलवंडे, माजी जि.प. सदस्य बालाजी बचेवार, बाबुराव जी लंगडापुरे, भास्कर पाटील भिलवंडे, संभाजी भिलवंडे, रविंद्र भिलवंडे, प्रदीप पाटील कल्याण आदींची उपस्थिती राहणार आहे.

 

नांदेड येथील सुप्रसिद्ध डॉ.श्री. राहुल कोटलवार (एम.डी.मेडिसीन, मधुमेह, थायोराईड, ह्रदयरोग विकार तज्ञ) नांदेड येथील मथुराई हॉस्पिटल चे डॉ. रुपाली जाधव/कल्याण (MBBS D. G. O.स्त्री रोग तज्ञ) डॉ. कपिल जाधव (MBBS D.C.H. बालरोग तज्ञ) डॉ. विश्वास पाटील चव्हाण (BAMS जनरल फिजिशियन) डॉ. शिवाजी कागडे(MD नागपुर जनरल फिजिशियन) डॉ.सौ.मंजुषा विश्वास पा. चव्हाण (BAMS स्त्री रोग प्रसूती शास्त्र आरोग्य अधिकारी ग्रामीण रुग्णालय नायगाव) डॉ. मीनाक्षी कागडे (BAMS प्रसूती शास्त्र) डॉ. सौ. प्रियांका वानोळे (BAMS स्त्री रोग प्रसूती शास्त्र आरोग्य अधिकारी ग्रामीण रुग्णालय नायगाव) आदी नामवंत डॉक्टर्स यांचे मार्फत आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

त्यात bp, ब्लड शुगर, इ.सी.जी. लहान मुलांचे आजार, आणि महिलांचे आजार यांची तपासणी व रोग निदान मार्गदर्शन वरील नांदेड येथील सुप्रसिद्ध डॉ.यांच्या माध्यमातून होणार आहे तरी तालुक्यातील सर्वच पत्रकार बांधवानी आपल्या सर्व कुटुंबियांची आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आव्हान नायगाव तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!