Home कंधार ट्रक व मोटरसायकलच्या अपघातात दोन तरुण जागीच ठार -NNL

ट्रक व मोटरसायकलच्या अपघातात दोन तरुण जागीच ठार -NNL

उस्माननगर, माणिक भिसे। उस्मान नगर ते कंधार रोडवरील मोतीराम महाराज देवस्थान पाटी जवळील संभाजी पाटील कलाल (कलंबर खुर्द) यांच्या शेताजवळ कंधार कडून भरधाव येणाऱ्या ट्रकने मोटरसायकला आमने सामने जोराची धडक बसल्याने दोन तरुण जागीच ठार झाले.

सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग 50 वर मागील अनेक महिन्यापासून वाहनाच्या अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या महामार्गावर वाहतुकीच्या प्रमाणात वाढ झाल्याने वाहन चालक भरधाव वाहन चालवून अपघाताचे प्रमाण वाढत आहेत.

दिनांक 01. डिसेंबर रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान कंधार कडून येणारा ट्रक क्रमांक एन. एल .01. एबी 9092 या नंबरची ट्रक नांदेड कडे निघाले असता याच वेळी कंधार कडे निघालेले दोन तरुण मोटरसायकल वरून जात असताना मोतीराम महाराज देवस्थान पाटील जवळील संभाजी पाटील यांच्या शेताजवळ येताच ट्रकने भरधाव वेगात मोटर सायकला धडक दिली की, मोटरसायकल २५० ते ३०० फुट घासत जाऊन दोन तरुण मरण पावले .

मोटरसायकल घसरत गेल्याने पेट घेऊन मोटरसायकलचा कोळसा झाला . ट्रकने धडक दिल्याने दोन तरुण जागीच मरण पावले या घटनेची माहिती उस्माननगर पोलिस स्टेशनला कळताच . घटनास्थळी पो.स्टे.चे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी भेट देऊन हे वृत्त लिहीपर्यंत तपास पंचनामा करीत आहेत .

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!