Home क्राईम हदगाव वेअर हाऊस शेतीमाल घोटाळा ! कदम बंधुची पोलीस कोठडी वाढली -NNL

हदगाव वेअर हाऊस शेतीमाल घोटाळा ! कदम बंधुची पोलीस कोठडी वाढली -NNL

हदगाव, शे चांदपाशा| हदगाव तालुक्यातच नव्हे विदर्भातील शहरात इतर जिल्ह्यातील शहरातही कदम बंधुचे कारनामे वाढत असुन, त्यांची व्यापती वाढत आहे. आरोपी कदम बंधुकडुन आतापर्यत पोलिसांनी ७५६ कट्टे सोयाबीन व २९२ कट्टे हळद तपास पोलिस निरक्षक गोविंद खैरे यांनी जप्त केले. यापुर्वी न्यायालयाने पाच दिवसाची पोलिस कोठडी दिली होती. ती संपल्याने अणखीन न्यायालयाने ३ डिसेबर २०२१ पर्यत वाढवुन दिलेली आहे.

विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील रहवाशी असणारे प्रशांत कदम व प्रविण कदम या कदम बंधुनी हदगाव शहरातील दोन खाजगी वेअरहाऊस किरायाने घेवुन येथील शेतकरी व व्यापा-याच विश्वास संपादन केला. याचा फायदा ह्या कदम बधुनी उचलला व विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात पुसद येथील बँकेत शेतक-याचा शेतीमाल गहाण ठेवला इतकेच नव्हे तर हदगाव शहरातील वेअरहाऊस मधील शेतीमाल विदर्भातील महागाव शहरात एका रिकाम्या जागी साठवून बेवारस पणे ठेवाण्यात आला होता. तेथील पोलिसांनी तो शेतीमाल ‘बेवारस म्हणून जप्त करुन एका गोडाऊन मध्ये ठेवला. तो माल हदगाव येथील शेतक-याचा आहे हे कदम बंधुनी पोलिस कस्डीत कबुली दिली.

तो शेतकरी कुंठ आहे…?
ज्या दिवशी कदम बंधुचे शेतीमालाचे घोटाळ्याचे ‘बिंग’ फुटले असताना अनेक शेतक-यांनी व्यापा-यानी हदगाव पोलिसाकडे धाव घेतली. त्या मध्ये एक युवा धानडय शेतकरी सागत होता की माझे लाखो रुपायच सोयाबीन वेअरहाऊस मध्ये होत. अस चौकशी करिता आलेल्या संबंधित बँकेच्या अधिका-यांना पोलिस स्टेशनच्या आवारात ओरडुन सागत होता. पण जेव्हा या प्रक्रणी पोलिसांनी गुन्हा नोद करुन या घोटाळ्याच्या आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले शेतीमाल ही हस्तगत केला. तरी तो युवा शेतकरी माञ कुठं गायब झाला या बाबतीत चर्चेला ऊत आला आहे.

सर्वात प्रथम शेतक-यांना त्यांचा शेतीमाल देणे ह्याला प्राधान्य -पो.उपनिरक्षक खैरे
हदगाव शहरातील वेअर हाऊस शेतीमाल अपहार प्रक्रणी आरोपी कबुली जरी देत असले तरी अणखीन त्यांची तीन दिवसाची न्यायालयाने या आरोपी कदम बंधुची पोलिस कोठडी मंजुर केली. इतर जिल्ह्यातील शहरातुन ही शेतीमाल हस्तगत करावायचा आहे. शेतक-याच्या हस्तगत केलेल्या शेतीमाल न्यायालयाच्या आदेशाने आमचा देण्याचा प्रयत्न आहे. अशी माहीती या वेअरहाऊस घोटाळ्याचे तपास करणारे पोलिस उपनिरक्षक गोविद खैरे यांनी सागितले.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!