Home लाइफस्टाइल हिमायतनगरात जलशुद्धीकरण केंद्राच आ.जवळगावकरच्या हस्ते भूमिपूजन -NNL

हिमायतनगरात जलशुद्धीकरण केंद्राच आ.जवळगावकरच्या हस्ते भूमिपूजन -NNL

हिमायतनगर, अनिल मादसवार| येथील नगरपंचायती अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राचा (पाणी फिल्टर) भूमिपूजन सोहळा दि.०३ डिसेंबर रोजी सकाळी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजने अंतर्गत मंजूर असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. शहरात पाईपलाईन सुरु असुन, यामध्ये नगरपंचायत कार्यालय, हिमायतनगरच्या बाजूस पाणीपुरवठा प्रकल्पाच्या जलशुद्धीकरण केंद्र (पाणी फिल्टर) कामच भूमिपूजन सोहळा दि.०३ डिसेंबर २०२१ शुक्रवारी हदगाव – हिमायतनगर तालुक्याचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार डी.एन.गायकवाड, हादगावचे तहसीलदार जीवराज डापकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष संजय माने, नाजीमचे माजी संचालक गणेश शिंदे, माजी जी.प.सदस्य सुभाषदादा राठोड, माजी जी.प.सदस्य समद खान, प्रथम नगराध्यक्ष अखिल भाई, माजी कृउबा संचालक रफिक सेठ, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोजखान पठाण, माजी नगरसेविका सौ.लक्ष्मीबाई भवरे, श्रीमती पंचफुलाबाई लोणे, शे.रहीम पटेल, अनंता देवकते, संतोष शिंदे, बाकी सेठ, खालिद भाई, हनीफ सर, नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी, आदींसह नागरिक उपस्थिती होती.

याच बरोबर वॉर्ड क्रमांक १६ मधील सिमेंट काँक्रेट रस्त्याचा भूमिपूजन आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. वॉर्डातील नागरिकांनी या भागात पावसाळ्यात घराघरात पाणी शिरते त्यासाठी अविकसित भागातील अन्य रस्ते नाल्याची समस्या मार्गी लावावावी अशी मागणी केली. त्यांच्या मागणीला दुजोरा देत आमदार महोदयांनी पुढील काळात सर्व रस्ते व नाल्यासह अन्य समस्या मार्गी लावण्यासाठी प्राधान्य देऊ असे आश्वासन दिले.

ठेकेदार अभियंत्याच्या नाकर्तेपणामुळे नागरिक अडचणीत
येथील पाणी पुरवठा नळयोजनेच्या कामाला मागील दोन वर्षांपासून परभणी येथील ठेकेदाराने सुरुवात केली आहे. मात्र अद्यापही नळयोजनेच्या विहिरीचे काम आणि आवश्यक असलेल्या एकही पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण केले नाही. असे असताना कोट्यवधींच्या निधीतून करण्यात आलेले नवीन रस्ते फोडून पाईपलाईन करण्याचा सपाटा सुरु आहे.

त्यातही ठेकेदार मनमानी करत असून, अनेक वॉर्डातील कामे अर्धवट ठेऊन केवळ योजनेचे निधी उचलून घेण्यासाठी धडपड करत असल्याचे दिसते आहे. अश्या प्रकारामुळे बहुतांश रस्ते उखडलेले जैसेथेच ठेवण्यात आले आहेत. परिणामी उखडलेल्या अनेक रस्त्यातीत लोखंडी सळ्या वर आल्या आहेत. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या जिकरीचे सामना करावा लागत असून, अनेक वाहने पंचर होणे, टायर फुटणे, लहान बालके पडून जखमी होणे अश्या घटना घडत आहेत. असे असताना या कामाची देखरेख करणारे अभियंता यांचं दुर्लक्ष होत असल्याने ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा बाबत नागरीकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याकडे आमदार महोदयांनी लक्ष देऊन नागरिकांची होणारी अडचण व अपघात पाहत ठेकेदारास तंबी द्यावी आणि लवकरात लवकर नळयोजनेचे काम पूर्ण करून खोदून ठेवलेल्या रत्स्याचे मेंटेनन्स करून घेऊन जनतेच्या अडचणी सोडवाव्यात अशी मागणी जोर धरत आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!