Home करियर जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय सिडकोचे प्रा.रावसाहेब दोरवे यांना समाजकार्य विषयात पी.एचडी. -NNL

जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय सिडकोचे प्रा.रावसाहेब दोरवे यांना समाजकार्य विषयात पी.एचडी. -NNL

नविन नांदेड। सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्याल सिडकोचे प्रा.रावसाहेब दोरवे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याच्या अंमलबजावणीत ग्रामपंचायतीची भूमिका-एक अभ्यास (संदर्भ नांदेड जिल्हा) या विषयावर संशोधन केले असून त्यांना मानवलोक समाजकार्य महाविद्यालय, अंबाजोगाई जि.बीड येथील प्राचार्य डॉ.प्रकाश जाधव यांचे संशोधन मार्गदर्शक तर सह- संशोधन मार्गदर्शक म्हणून स्वा.रा.ती.म.वि.नांदेड येथील सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक प्रोफेसर डॉ.घन:श्याम येळणे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

ऑनलाइन पी.एचडी.पदवी मौखिक परीक्षा स्वा.रा.ती.म.वि.नांदेड येथील आंतरविद्याशाखेच्या अधिष्ठाता प्रा.डॉ.वैजंयता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तर बहिस्थ परीक्षक म्हणून लोकसेवक मधुकरराव चौधरी ,समाजकार्य महाविद्यालय, जळगाव येथील ज्येष्ठ प्रोफेसर डॉ.उमेश वाणी, संशोधक मार्गदर्शक प्राचार्य डॉ.प्रकाश जाधव, सह-संशोधक मार्गदर्शक संचालक प्रोफेसर डॉ.घन:श्याम येळणे आणि विद्यार्थ्याची उपस्थिती होती.

प्रा.डॉ.रावसाहेब दोरवे यांनी महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, समाजकार्य विभाग, लातूर येथे १९८६ रोजी या वर्षात समाजकार्य पदवी तर सन १९८८ या वर्षात एम.एस.डब्ल्यू. हे कर्वे समाजसेवा संस्था, पुणे येथे पूर्ण केले त्यानंतर त्यांनी आशा केंद्र, पुनतांबा, जि.अहमदनगर येथे फिल्ड कॉर्डिनेटर म्हणून ४ वर्ष तर मुंबई येथील कासा (CASA) संस्थेत ३ वर्ष फील्ड ऑफिसर म्हणून उल्लेखनीय सामाजिक कार्य केले असून या संस्थेअंतर्गत 1993 च्या प्रलयंकारी भूकंपग्रस्त किल्लारी लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावात मदत व पुनर्वसन कार्यात सक्रिय सहभाग होता.

त्यांची अध्यापनाची एकूण २४ वर्ष पूर्ण झाली असून सध्या ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, येथे समाजकार्य अभ्यास मंडळाचे निमंत्रित सदस्य म्हणून कार्यरत असून त्यांनी १५ वर्ष राष्ट्रीय सेवा योजनेत कार्यक्रमाधिकारी म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कार यांच्या सह प्राप्त झाला असून, त्यांनी रासेयोमध्ये जिल्हा समन्वयक म्हणून तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे रासेयो सल्लागार समिती सदस्य कार्यरत आहे.

यशाबद्दल श्री. सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.नानासाहेब जाधव,संस्थेचे सचिव तथा नगरसेवक श्रीनिवास जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डब्ल्यू.आर.मुजावर,प्रा. डॉ. निरंजन कौर, प्रा.डॉ.नरहरी पाटील, प्रा.डॉ.मनीषा मांजरमकर, प्रा.डॉ.अशोक वलेकर, प्रा.विद्याधर रेड्डी, प्रा. डॉ. प्रतिभा लोखंडे, प्रा.डॉ. मेघराज कपूर डेरिया, प्रा.डॉ.शेख ए.ए.प्रा.डॉ.अंबादास कर्डिले, डॉ. शिवाजी शिंदे, प्रा. डॉ. दिलीप खटोड, प्रा.सुनील राठोड, प्रा. गोपाल बडगिरे, प्रा. सुनील गोईनवाड, प्रा.डॉ. सत्वशीला वरगंटे यांच्या सह शिक्षकेतर कर्मचारी यांनी व लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील समाजकार्य विभाग प्रमुख प्रा.डॉ दिनेश मोने, प्रा.काशिनाथ पवार आणि प्रा.डॉ.संजय गवई यांनी अभिनंदन केले आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!