Home करियर हिमायतनगरातील आर एम इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना बौद्धिक मार्गदर्शन – NNL

हिमायतनगरातील आर एम इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना बौद्धिक मार्गदर्शन – NNL

हिमायतनगर| विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी, मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडून येण्यासाठी त्यांच्या स्वप्नांना योग्य दिशा देण्यासाठी आर एम इन्स्टिट्यूटच्या वतीने बौद्धिक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

आर एम इन्स्टिट्यूट हिमायतनगर संस्थापक श्री राम सर बोलपेलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षक वृंद रूपाली गुंडेवार, रितिषा धुमाळे, मिरेवाड सर यांनी अत्यंत नवीन उपक्रम राबविला. या मार्गदर्शन शिबिरास नांदेड येथील प्रमुख वक्ते नागसेन तुळसे सर यांनी विद्यार्थ्यांच्या वयोगटाला अनुसरून त्यांच्याशी संवाद साधला व विद्यार्थ्यांच्या प्रत्येक स्वप्नांना प्रश्नांचे उत्तर देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजा भगीरथ विद्यालय हिमायतनगरचे मुख्याध्यापक दिक्कतवार सर होते. हुमा जयवंतराव महाविद्यालयाचे सिनियर लेक्चर सावंत सर, हिमायतनगर पोलिस स्टेशनचे बीट जमादार हेमंत चोले व प्रमुख पाहुणे म्हणून श्री नृसिंह इंग्लिश स्कूलचे संस्थापक श्री मारावार सर होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या चांगल्या स्वप्नांना वाव देण्यासाठी अमूल्य असे बौद्धिक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देऊन प्रेरित केले.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!