Home क्राईम प्रशासन सुस्त असल्याचा परिणाम ! शहरात व कारवाई नसल्याने सर्वकाही बिनधास्त सुरु – NNL

प्रशासन सुस्त असल्याचा परिणाम ! शहरात व कारवाई नसल्याने सर्वकाही बिनधास्त सुरु – NNL

हदगाव, शे.चांदपाशा| शहरात व परिसरात तरुणवर्गासह अनेकांना गुटखा व धुम्रपान दारुचे जबरदस्त व्यसन लागलेले दिसुन येत आहे या बाबतीत संबंधित प्रशासनाकडुन जनजागृति व ठोस कारवाई होत नसल्याने बीडी सिगारेट कुंठ दारु मिळते धुम्रपान व तंबाखू च्या पिचका-या मारण्यात येत आहे.

शहरातील बसथानक सिनेमा टाकीज परिससर आठवडी बाजार आझाद चौक इतकेच नव्हे तर हाँटेल चहाच्या टप-या काही पानटप-याच्या सभोवताल ही सिगारेट व्यतरिक्त अवैध देशी दारुच्या बाटल्याची पण विक्री होतांना दिसुन येत आहे. यावर कोणाचही नियंत्रण नसल्याने संबंधित प्रशासनाचे नियंत्रण नसल्याच स्पष्ट जाणवत आहे. असे स्पष्ट चिञ दिसुन येत आहे अन्न व औषध प्रशासनसह इतर शासकीय विभागाला कारवाई करण्याचे अधिकार असतांना प्रशासनाकडुन कारवाई होत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे शहरातील व परिसरातील काही भागात तरअल्पवयीन मुले ही खुलेआम सिगारेटाचे झुरके मारतांना दिसुन येत आहे. व्यसनी तरुण व नागरिक सार्वजनिक ठिकाणी आपले व्यसन बिनधास्तपणे करत असल्याने इतराना त्यांचा ञास होत आहे. त्याची माहीती असते पण आपल्यावर कोण कारवाई करणार याची भितीच नसल्याने अश्या प्राकारे हे वागत असतात. हदगाव शहरात नगरपालिका व अन्न व औषध प्रशासन यांनी पोलिसाची मदत घेवुन दडांत्मक कारवाई करण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम राबविण्यात यावी. अशी मागणी आता नागरिकांकडुन होत आहे. शाळा परिसरात मुख्याध्यपक नगरपालिका वैधकीय अधिका-याचा पथक आणि पोलिस यांनी सयुक्त कारवाईची अवश्यकता असुन माञ या बाबतीत विविध प्रशासकीय विभागच एकमेकांचा समन्वय नसल्याच दिसुन येते. सध्या तरी जबाबदार प्रशासन सुस्त असल्याचे दिसुन येत आहे.

दंडाचे अधिकारा असतांना ही …?
अन्नव औषध प्रशासनाला सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणा-या व तबाखुच्या पिचका-या मारणा-याना दडात्मक कारवाईचे आधिकार प्राप्त आहेत. तसेच नगरपालिका वैधकीय अधिकारी. महसुल अधिकारी शाळा व्यवस्थापन समिती व पोलिसांना पण अधिकार प्राप्त असताँना माञ अशी कारवाई होत नसल्याचे दिसुन येत आहे हे आवर्जून उल्लेख करावा लागेल.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!