Home क्राईम हिमायतनगर तालुक्यातील एकंबा गावात चोरांच्या टोळीने घातला धुमाकूळ -NNL

हिमायतनगर तालुक्यातील एकंबा गावात चोरांच्या टोळीने घातला धुमाकूळ -NNL

घातक हत्यार घेऊन चोरटे फिरत असल्याने सर्वसामान्य माणूसन पुढे यायला तयार नाही

हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरासह तालुक्यात चोरट्यांच्या टोळीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या घटनांना रोखण्यात हिमायतनगर पोलीस कमी पडत असल्याचा आरोप नागरीकातून केला जात आहे. अनेक गावातील नागरिक चोरट्यांचा प्रकार रोखण्यासाठी रात्रंदिवस गस्त करत असताना चोरीचे प्रमाण कमी न होता वाढतच असल्याचे चित्र आजच्या मध्यरात्रीला हिमायतनगर तालुक्यातील एकंबा येथे झालेल्या चोरीच्या घटनेतून पुढे आले आहे. या ठिकाणी चोरट्यानी अक्षरशः धुमाकूळ घालत सोने, चांदीच्या दागिन्यांच्या नगदी रक्कम लंपास केली आहे. या घटनेमुळे पुन्हा चोरट्यांनी

मागील काही महिन्यापासून हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागात चोरटयांच्या टोळीने उच्छाद मांडला आहे. या चोरटयांनी अगोदर कुलुपबंद घर फोडण्याचा सपाटा लावला. त्यानंतर मंदिराच्या दानपेट्या फोडणे, भुसार दुकाने फोडून साहित्यासह रक्कम लंपास करणे आदी घटना घडविल्या. त्यानंतर चोरट्यानी आता नागरिक घरात असताना देखील घरचे दार काढून किंवा छतावरून आत शिरणे, आणि अल्माऱ्या व सामानाची नासधूस करत मिळेल ते साहित्य चोरून नेण्याला सुरुवात केली आहे.

या अगोदर चोरटयांनी सवना, बोरगडी, घारापूर आदी गावातील नागरिक गाढ झोपलेले असताना घरात शिरून सोने-चांदीचे दागिने चोरून नेले. एवढेच नाहीतर अडथळा करणाऱ्या नागरिकांवर हल्ला करून जखमी केल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. काही ठिकाणी तर चोरट्याना नागरिक जागी झाल्याने पळ काढावा लागला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात तालुक्यात चोरट्यांच्या हालचाली होत असताना देखील अद्यापपर्यंत एकही घटनेतील चोरट्यास पकडण्यात पोलिसांनी यश आले नसल्याने नागरीकातून आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलीस ठाण्यात चौकशी केल्यास पोलिसांची संख्या कमी असून, रात्रगस्त घालताना एकीकडे पोलीस गेले कि दुसरीकडे चोरटे आपले काम फत्ते करत असल्याचे सांगितले जात आहे.

आजवर घडलेल्या चोरीच्या घटनांच्या तपासासाठी पोलीस बांधव प्रयत्न करत आहेत, यासाठी यांनी श्वान पथक, ठसे तज्ञानाची मदत घेतली. मात्र चोरट्याने शोधण्यात आतपर्यंत तरी यश आले नाही, यामुळे चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही. असाच प्रकार दि.०४ च्या मध्यरात्रीच्या तालुक्यातील एकंबा गावात घडला आहे. चोरट्यांच्या टोळीने रात्रीला गावात शिरून दोन ते तीन घरे फोडून चोरी केली आहे अशी माहिती येथील जागरूक युवक प्रभू कल्याणकर यांनी दिली. तर अन्य भागातही चोरीचा प्रयत्न झाला. तसेच चोरटे शेलोडाकडे पळून गेल्याने आम्ही त्या गावातील नागरिकांना सांगितले असल्याचे माहिती रामेश्वर पिटलेवाड यांनी दिली. शेलोडा वासियांना सतर्क केल्यामुळे गावकरी जागे झाले. यावेळी चोरट्यानी काही घरात शिरण्यासाठी काडी कोंडा कडून आत प्रवेश करत होते. मात्र गावकरी बाहेर निघताच चोरट्यानी पळ काढला काहीं चोरट्याने पळून जाताना गावकर्यांनी पाहीले असल्याची माहिती माजी सरपंच राजू पाटील शेलोडेकर यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली.

त्या चोरट्याकडे तलवार, टॉमी, लोखंडी सळ्या असे मोठे घातक हत्यार आहेत, त्यामुळे त्यांचा सामना करण्याचे धाडस सामान्य नागरिकांना होत नाही. त्यामुळे पोलिसांनी अश्या चोरट्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. या चोरट्याने अनेकांनी रात्रीला बाहेर फिरताना घरातून पहिले आहे, पण काही करू शकत नाही अशी परिस्थती निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरात देखी, या चोरट्यांची चांगली दहशत निर्माण झाली असून, भीतीपोटी नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. या चोरट्यांच्या टोळीचा बंदोबस्त करणे गरजेचे असल्याचे नागरिक बोलून दाखवीत आहेत.

एवढेच नाहीतर चोरट्यांचे काही सहकारी मध्यरात्रीच्या हिमायतनगर शहरातील वॉर्ड क्रमांक १० व १२ आले होते. परंतु युवक बाहेर फिरत असल्याचे पाहून चोरटयांनी शहरातून काढता पाय घेतल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर पोलीस एकंबा गावात श्वान पथक व ठसे तज्ञांसह दाखल झाली. मात्र येथे चोरट्यांचा काही सुगावा लागला नाही. वृत्त लिहीपर्यंत पोलीस डायरीत शहरासह तालुक्यात झालेल्या चोरीच्या घटनेबाबत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. एकूणच शहर व ग्रामीण भागात होत असलेल्या चोरी, लूटमार, घरफोडीच्या घटनाचे गांभीर्य लक्षात घेता हिमायतनगर पोलीस ठाण्यात लोकसंख्येच्या प्रमाण पोलीस अधिकारी, कर्मचारी नियुक्त करून येथील रिक्त जागा भराव्यात आणि नागरिकांना सुरक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे. 

वाढत्या चोरीच्या घटनांना आवर घालण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करून गावात गस्त घालणे सुरु करणे गरजेचे आहे. आमच्या आव्हानाला प्रतिसाद देत अनेक गावातील युवकांनी रात्रगस्त सुरु केली आहे. ज्या गावात घटना घडल्या आणि जेथे घटना घडल्या नाहीत अश्या गावातील नागरिकांनी देखील ग्रासम सुरक्षा दलाची स्थापना करावी. काही गुप्त माहिती मिळाल्यास पोलिसाना कळवुन चोरट्याना पकडण्यासाठी पोलिसाना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांनी केले आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!