Home कंधार उस्माननगर विशेष ग्रामसभेत पत्रकार संघाकडून विविध विकास कामासाठी केली मागणी -NNL

उस्माननगर विशेष ग्रामसभेत पत्रकार संघाकडून विविध विकास कामासाठी केली मागणी -NNL

उस्माननगर। शासनाच्या दिलेल्या आदेशानुसार दि ३ डिसेंबर रोजी उस्माननगर येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सरपंच श्रीमती गयाबाई घोरबांड यांच्या अध्यक्षतेखाली विकास आराखडा विशेष ग्रामसभेचे गाव वार्षिक आराखडा नियोजन ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने विविध विकास कामांसाठी निवेदन देऊन मागणी केली.
उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार सभागृहासाठी विकास आराखड्यातून ५० हजार रुपये निधीची तरतूद करण्यात यावी, यातून , देखभाल, दुरूस्ती, रंगरंगोटी , पत्रकार दिना पुर्वी करण्याची व्यवस्था करावी.

पत्रकार संघाकडून या विकास आराखड्यात गावातील स्मशानभूमी विकास कामांसाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी, यात लोकसंख्येच्या प्रमाणात व्यवस्था , पाण्याची सोय , जाण्या – येण्यासाठी रस्ता , सुशोभीकरण, अंत्यसंस्कार वेळीं पाहूण्याना बसण्यासाठी वाढीव शेड , एकाच वेळी तीन ते चार जाळे अंत्यसंस्कार करण्यात येतील असे प्रशस्त व्यवस्था करावी, पावसापासून संरक्षण , संरक्षण भिंत, उभारणी करण्यात यावी,. जिल्हा परिषद शाळेला संरक्षण भिंत उभारुन शाळा डिजिटल व सर्व सुविधांनी युक्त करण्यात यावी.

गावातील सर्वच सार्वजनिक आड, विहीर, पडके झाले आहेत, त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी.पुढील अपघात टाळण्यासाठी संरक्षण जाळी बसवावी.गावात चौकाचौकात कचरा कुंड्या ठेवण्याची व्यवस्था करावी.व घंटा गाडीतून कचरा गावाबाहेर नेण्याची व्यवस्था करावी.सार्वजनिक ठिकाणी महीला व पुरुषांसाठी स्वच्छताग्रहाची व्यवस्था करावी.नगरपालिका , नगरपरिषद, प्रमाणे सिमेंट रस्त्यालगत संरक्षण जाळी (ट्री गार्ड) बसवून झाडे लावून जोपासना करणे. गावातील सर्वच मंदीरे, प्रार्थना स्थळे नेहमी स्वच्छ व रात्रीच्या वेळेस प्रकाशमय दिवे रहातील याची सोय करण्यात यावी खांबावर दिवाबत्तीची वेळेवर बसविण्यात येतील यांची खबरदारी घ्यावी.

आशा अनेक मागणीचा निवेदनद्वारे गाव वार्षिक आराखडा नियोजन ग्रामसभेचे अध्यक्ष श्रीमती गयाबाई घोरबांड यांच्या कडे दिले.यावेळी या मागणीचे समर्थन करीत लवकरच विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून गावातील मुख्य कामे करू आसे आश्वासन दिले.यावेळी ग्रामसेविका सौ. शिंदे -माने , उपसरपंच बाशीद शेख , विशेष ग्रामसभेचे निरीक्षक मु.अ.जयवंतराव काळे , ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!