Home करियर जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाला राष्ट्रीय सेवा योजनेचे तीन पुरस्कार -NNL

जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाला राष्ट्रीय सेवा योजनेचे तीन पुरस्कार -NNL

नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे पुरस्कार वितरण नुकतेच संपन्न झाले.

जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयातील प्रा. गोपाळ हनुमंत बडगिरे यांना राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार सन 2018 -19 प्राप्त झाला तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीना राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट स्वयंसेविका पुरस्कार कु. वैशाली राठोड सन 2018 -19 व कु. अभिलाषा मुळेकर सन 2019- 20 असे एकूण तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

पुरस्कार वितरण माननीय कुलगुरू डॉ .उद्धव भोसले ,नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा .श्री. निसार तांबोळी प्र-कुलगुरू डॉ .जोगेंद्रासिंह बिसेन यांच्या शुभ हस्ते पुरस्कार देण्यात आले पुरस्कार प्राप्त प्राध्यापक व विद्यार्थिनींचे श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. नानासाहेब जाधव, संस्थेचे सचिव तथा नगरसेवक मा. श्री .श्रीनिवास जाधव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डब्ल्यू. आर. मुजावर यांनी अभिनंदन केले आहे .तसेच महाविद्यालयातील डॉ. ए. पी .वलेकर डॉ .एम .ए. मांजरमकर डॉ .एन .जी. पाटील डॉ. एन. एस. सरदार. डॉ. पी .पी .लोखंडे डॉ .आर. सी .दोरवे. प्रा. व्ही. एस. रेड्डी डॉ. एम. ए .कपूर डॉ. डि. के. काठोडे डॉ.ए .ए. शेख डॉ. ए .एन .कर्डिले डॉ .एस. एस. शिंदे डॉ. एस .डी. वरगंटे प्रा. एस एस .गोईनवाड प्रा. एस. राठोड तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी श्री .बी .जे .गुंडे श्री .आर. एम. पाळेकर श्री .एस .मोरे श्री .एन .राठोड श्री. एस. कंधारकर इत्यादींनी पुरस्कार प्राप्त प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!