Home करियर पाळेकर यांना विघापिठाचा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार प्रदान -NNL

पाळेकर यांना विघापिठाचा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार प्रदान -NNL

नविन नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार श्री.सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिडको येथील जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालयाचे कर्मचारी तथा लिपीक राजेश्वर मनोहरराव पाळेकर यांना उत्कृष्ट कर्मचारी म्हणून विघापिठात एका सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत सपत्नीक देण्यात आला.

सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षा मध्ये ऊलेखनिय केलेल्या कामाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वर्धापनदिन निमित्ताने व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात उत्कृष्ट कर्मचारी म्हणून पुरस्कार १ डिसेंबर पद्मश्री डॉ. तात्याराव लहाणे, कुलगुरू डॉ. उध्दव भोसले,प्र.कुलगुरु बिसेन,माजी कुलगुरू डॉ.नागनाथ कोतापल्ले यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीत सपत्नीक शाल व श्रीफळ देऊन मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

या मिळालेल्या पुरस्कार बद्दल सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष कर्मवीर डॉ.नानासाहेब जाधव,सचिव तथा नगरसेवक अँड.श्रीनिवास जाधव, प्राचार्य डबलु,आर,मुजावर,व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!